Jitendra Awhad | शरद पवारांच्या राजीनाम्यानंतर जितेंद्र आव्हाडांचं ‘हे’ ट्विट चर्चेत

Jitendra Awhad | मुंबई : काल( 2मे) शरद पवारांना ( Sharad Pawar) राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तर त्यांच्यासमोरच व्यासपीठावरच भरल्या डोळ्यांनी त्यांना निर्णय मागे घेण्याची मागणी केली. त्या ठिकाणी उपस्थित राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) असोत, जयंत पाटील असोत किंवा धनंजय मुंडे सर्वांनी त्यांना विनंती देखिल केली . याचप्रमाणे कार्यकर्त्यांनी देखील आंदोलन करत जोपर्यंत पवार साहेब निर्णय मागे घेणार नाहीत तोपर्यंत आम्ही या ठिकानवरून उठणार नाही अशी भूमिका घेतली होती. तर आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनीही ट्वीटद्वारे शरद पवारांना राजीनामा परत घ्यावाच लागेल, अशा शब्दांत अधिकारवाणीने शरद पवार यांना साद घातली आहे. त्याच्या या ट्विट ची सध्या चर्चा होत आहे.

जितेंद्र आव्हाड ट्विटद्वारे काय म्हणाले (What Jitendra Awad said tweet)

जितेंद्र आव्हाड ट्वीटमध्ये म्हणतात की, “पवार साहेब तुम्हांला राजीनामा देण्याचा अधिकार कोणी दिला. कुठलीही भूमिका घेताना ज्या बाजूने लोकहीत आहे त्याच बाजूने निर्णय झाला पाहिजे; कदाचित तो आपल्या मनाला पटला नाही तरी चालेल. पण लोकशाहीच्या विरोधात कुठलाही निर्णय जाता कामा नये असं तुम्ही आम्हांला सांगत आला आहात आणि आज कोणाचाही विचार न करता तुम्ही राजीनामा देऊन आम्हांला वाऱ्यावर सोडून निघून जात आहात. या सगळ्या वादळ वाऱ्यांना आम्ही गेली अनेक वर्षे तोंड देत आहोत ते केवळ एकच शब्दामुळे शरद पवार. साहेब तुम्हांला असं महाराष्ट्रातील तुमच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना अनाथ करून जाता येणार नाही. तुम्हांला राजीनामा परत घ्यावाच लागेल.” अशा शब्दांत आव्हाड यांनी शरद पवारांना राजीनामा मागे घेण्याचा आग्रह धरला आहे.

दरम्यान, जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) पुढे म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्रात उद्यापासून तीव्र आंदोलनं देखील सुरू होऊ शकतात. तसचं मी स्वतः ३५ ते ४० वर्ष राजकारणात आहे, त्यांचं बोट धरून पुढे आलो आहे. ते राजकारणात नसतील तर आम्ही तरी कशाला राहायचंय या राजकारणात. संपलं आमचं पण राजकारण. हीच भावना अनेकांची आहे. शरद पवार हे लोकभावनेचा आदर करणारे, लोकशाही मानणारे नेते आहेत. ते लोकांच्या भावनेचा आदर करतील, ते सकारात्मकपणे विचार करतील आणि योग्य तो निर्णय घेतील. आणि त्यांनी सर्वांचा विचार करून लवकरच राजीनामा मागे घ्यावा अशी मागणी देखील केली आहे. तर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील पवारांना भावनिक पत्र लिहून या निर्णयाचा पुन्हा विचार करावा बदल हा घडला पाहिजे असं देखील म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

 

 

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.