Nitesh Rane । “पहिलं बाळासाहेबांचं घर तोडलं, आणि आता पवार…”; नितेश राणेंचं संजय राऊतांवर निशाण

Nitesh Rane । मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील राजकीय वातावरण पार ढवळून निघालं आहे. तर
शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत ( Sanjay Raut) आणि भाजपा ( BJP) नेते नितेश राणे ( Nitesh Rane) यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने शाब्दिक टीका टिप्पणी सुरू आहेत. गेल्या दोन दिवसांपूर्वीच नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत संजय राऊतांवर हल्लाबोल केला होता. काल ( 2मे) राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार ( Sharad Pawar) यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरील निवृत्तीची घोषणा केली. यावरून संजय राऊत यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या राजीनाम्याची आठवण काढत शरद पवारही राजीनामा मागे घेतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. परंतु, राऊतांच्या या वक्तव्यावर आता पत्रकार परिषद घेत नितेश राणे यांनी निशाणा साधला आहे.

पहिलं बाळासाहेबांचं घर तोडलं आता पवारांचं : नितेश राणे ( First Balasaheb’s house was demolished, now Pawar’s: Nitesh Rane)

माध्यमांशी बोलताना नितेश राणे म्हणाले की, “संजय राऊतसारखा माणूस घरात घेण्याच्या लायकीचा नाही.जर त्याला घरात घेतल तर त्या घराचं वातावरण कसं खराब करायचं, भांडणं कशी लावायची यावर याची रोजीरोटी चालते. तेच आता पवारसाहेबांच्या घरात करताना दिसतोय. पहिलं बाळासाहेबांचं घर तोडलं, आणि आता पवारांचं सोडत आहे. तसचं पवार कुटुंबीयांतील संदर्भात कोणताही विषय असला तरीही महाराष्ट्रातील कोणताही राजकारणी त्यावर बोलत नव्हता. पण एकमेव संजय राऊत होता, त्यानं अजितदादांविरोधात भाष्य केलं. याला कोणी अधिकार दिला. याला काय गरज पडली? जे काही पवार कुटुंबीयात करायचं आहे ते आपसात बघून घेतील. आधुनिक शकुनी मामा आहेस का तू?” असा सवालही नितेश राणे यांनी विचारलं आहे.

दरम्यान, 1 मे ला झालेल्या महाविकास आघाडीच्या सभेवेळी सर्वांनी पहिलंच असेल की, अजितदादांचा अपमान करायचा प्रयत्न केला. जेव्हा अजित दादा स्टेजवर आले, सर्वांना भेटत पुढे जात होते, पण हा कसा भेटला त्यांना ते पाहा. त्यांच्याकडे बघतही नव्हता. आखडून उभा होता. भाषण करत असताना अजित दादांचे गोडवे गायला लागला. शकुनी मामालाही लाज वाटेल, की हा माझ्यापेक्षा जास्त कपटी आहे. शकुनी मामा बरा होता, असं बोलण्याची वेळ आलेली आहे. अशा शब्दांत नितेश राणेंनी संजय राऊतांवर टीका केली. यामुळे आता राणे आणि राऊत असं युद्ध राजकीय वर्तुळात पेटलेला पाहायला मिळत आहे. याचप्रमाणे आज शरद पवार राजीनामा बद्दल घेतलेला निर्णय माघारी घेणार का? जर नाही घेतला तर कोण असणार राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या-