Anil Patil | अनिल पाटील यांनी दिला आमदारकीचा राजीनामा

Anil Patil | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे. पवारांनी हा राजीनामा मागे घ्यावा अशी मागणी पदाधिकारी आणि कार्यकर्ते करत आहेत. अशात राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे.

शरद पवार यांच्या निवृत्ती निर्णयानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अनिल पाटील यांनी शरद पवार यांना आमदारकी राजीनामा पत्र पाठवलं आहे. त्याचबरोबर ‘पवार साहेब तुम्हाला राजीनामा देण्याचा अधिकार कोणी दिला’, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. पवारांचे मन परिवर्तन करण्याचा प्रयत्न पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी करत आहेत.

अनिल पाटील यांनी पवारांना लेखी निवेदन केलं आहे. “माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता आपल्या आणि पक्षाच्या विचारधारेवर आणि ताकदीवर निवडणूक लढवून आमदार म्हणून निवडून आला आहे. तुम्ही घेतलेल्या या निर्णयामुळे माझ्यासह लाखो पदाधिकारी आणि कार्यकर्ते खचून गेले आहेत. तुम्ही घेतलेला निर्णय मागे घ्या अन्यथा मला आमदारकीचा राजीनामा देण्याची परवानगी द्यावी”, अशी विनंती पाटील यांनी केली आहे.

दरम्यान, मीडिया रिपोर्टनुसार अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अध्यक्ष पद मिळणार नसल्याचं सांगितलं आहे. अजितदादा ऐवजी एका महिला नेतृत्वाकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष पद जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादीचे अध्यक्ष पद सुप्रिया सुळे यांच्याकडे जाणार असल्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या