Job Opportunity | महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी (ESIS) यांच्यामार्फत नोकरीची संधी! ‘या’ पद्धतीने करा अर्ज

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी (Employees State Insurance Society ESIS), सोलापूर यांच्यामार्फत रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरतीसाठीची अधिसूचना संबंधित अधिकृत संकेतस्थळावर जारी करण्यात आली आहे. त्यानुसार ही रिक्त पदे भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहे.

महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) विविध पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये पूर्णवेळ/अर्धवेळ विशेषज्ञ- 03 जागा आणि वैद्यकीय अधिकारी- 09 जागा भरल्या जाणार आहे.

या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

पात्र आणि इच्छुक उमेदवारांना या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) मुलाखतीसाठी दिनांक 9 मे 2023 रोजी उपस्थित राहावे अनिवार्य आहे. उमेदवारांना खालील पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थित राहावे लागणार आहे.

मुलाखतीचा पत्ता (Address of interview)

प्रशासकीय ब्लॉक, 4था मजला, MH-ESIS हॉस्पिटल, आकुर्ली रोड, ठाकूर हाऊस जवळ, कांदिवली पूर्व, मुंबई-400101.

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/1XyHCAa5GMCofStMP-iAx0w1cgp-nCeR4/view

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://www.maharashtra.gov.in/1125/Home

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.