Sudhir Mungantiwar | “राष्ट्रीय दर्जा गेलेल्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कसा असेल?”: सुधीर मुनगंटीवार

Sudhir Mungantiwar | भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. यामुळे सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून जोरदार प्रतिक्रिया या प्रकरणी येत आहेत. तर राज्याच्या राजकारणात बऱ्याच घडामोडी घडत आहेत. त्यांनी आपला राजीनामा मागे घ्यावा, अशी विनंती पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांकडून केली जातेय. जितेंद्र आव्हाड यांनी पक्षाच्या सरचिटणीस पदाचा राजीनामा देखील दिला आहे. यावरून आता भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी एक वेगळाच प्रश्न उपस्थित करत निशाणा साधला आहे.

काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार ( Sudhir Mungantiwar comment On Sharad Pawar )

माध्यमांशी बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, “ काही दिवसांपूर्वीच निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्ष म्हणून जी मान्यता होती ती काढली आहे. मग राष्ट्रीय अध्यक्ष कसा? असा सवाल उपस्थित केला आहे. तर निवडणूक आयोगाने राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला आहे. त्यामुळे यावर भाष्य करण्याची आवश्यकताच नाही. प्रादेशिक अध्यक्ष असेल तर ठीक आहे. पण यावर मी भाष्य करण्याची आवश्यकताच नाही”, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

अजित पवार अध्यक्ष झाले पाहिजे – संजय शिरसाट 

संजय शिरसाट यांनी देखील याबाबत प्रतिक्रिया दिली होती की, “शरद पवारांचं कार्यकर्त्यांवरचं प्रेम सर्वांनाच माहिती आहे. आजही त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांची नावं माहिती आहेत. मला विचारलं तर आज कामाच्याबाबतीत विचार केला, तर अजित पवारांचं नाव पुढं येतं. सकाळी ८ वाजता येऊन मंत्रालायत बसणे असो किंवा कार्यक्रमांना वेळेवर हजेरी लावणे असो, कामाच्याबाबतीत त्यांचा हात कोणीही पकडू शकत नाही. त्यामुळे उद्या जर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा विषय आलाच तर निश्चित अजित पवार हे अध्यक्ष झाले पाहिजे, अशी कार्यकर्त्यांची भावना असेल”, असं संजय शिरसाट म्हणाले आहेत. यामुळे सत्ताधारी पक्षाकडून देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सध्याच्या गोंधलेल्या परिस्थितीत भाजपमध्ये प्रवेश दिला जाईल अशी खुली ऑफर दिली जात असल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील टोला लगावला आहे. बावनकुळे म्हणाले की, आमच्या कार्यालयात पक्षप्रवेशासाठी कुणीही आलं तर आम्ही त्यांचा पक्षप्रवेश करू… अद्याप राष्ट्रवादी काँग्रेसमधील कोणत्याही नेत्याने आमच्याशी तसा संपर्क साधला नाही, असं विधान बावनकुळे यांनी केलं आहे. तसचं

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.