Tomato For Tanning | उन्हाळ्यामध्ये टॅनिंग दूर करण्यासाठी टोमॅटोचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Tomato For Tanning | टीम महाराष्ट्र देशा: टोमॅटो आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. त्याचबरोबर टोमॅटो आपल्या त्वचेसाठी देखील खूप उपयुक्त ठरू शकते. बहुतांश लोक त्वचेची काळजी घेण्यासाठी टोमॅटोचा वापर करतात. त्याचबरोबर त्वचेवरील टॅनिंग दूर करण्यासाठी टोमॅटो मदत करू शकतो. टोमॅटोमध्ये आढळणारे गुणधर्म त्वचेवरील टॅनिंग सहज दूर करू शकतात. टोमॅटोचा खालील पद्धतीने वापर करून तुम्ही त्वचेवरील टॅनिंग दूर करू शकतात.

साखर आणि टोमॅटो (Sugar & Tomato For Tannin)

साखर आणि टोमॅटोच्या मदतीने चेहऱ्यावरील ट्रेनिंग दूर करता येऊ शकते. यासाठी तुम्हाला एक टोमॅटो बारीक करून त्यामध्ये एक चमचा साखर मिसळून घ्यावी लागेल. या मिश्रणाच्या मदतीने तुम्हाला साधारण दहा मिनिटे चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा कोमट पाण्याने धुवावा लागेल. या मिश्रणाचा वापर केल्याने त्वचेवरील टॅनिंग हळूहळू दूर होते.

बेसन आणि टोमॅटो (Besan & Tomato For Tannin)

चेहऱ्यावरील टॅनिंग दूर करण्यासाठी बेसन आणि टोमॅटो उपयुक्त ठरू शकते. यासाठी तुम्हाला एक चमचा बेसनामध्ये दोन चमचे टोमॅटोचा रस मिसळून घट्ट पेस्ट तयार करून घ्यावी लागेल. ही पेस्ट तुम्हाला साधारण पंधरा मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावी लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. नियमित याचा वापर केल्याने तुम्हाला तुमच्या त्वचेमध्ये फरक जाणवेल.

मध आणि टोमॅटो (Honey & Tomato For Tannin)

मध आणि टोमॅटोमध्ये आढळणारे गुणधर्म त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. यासाठी तुम्हाला टोमॅटो कापून त्यावर मध लावून घ्यावा लागेल. याच्या मदतीने तुम्हाला चेहऱ्यावर गोलाकार पद्धतीने मसाज करावी लागेल. पंधरा मिनिटानंतर तुम्हाला तुमचा चेहरा थंड पाण्याने धुवावा लागेल. या मिश्रणाच्या मदतीने टॅनिंग आणि पिगमेंटेशन दोन्ही समस्यांपासून आराम मिळू शकतो.

उन्हाळ्यामध्ये त्वचेवरील टॅनिंग दूर करण्यासाठी तुम्ही वरील पद्धतीने टोमॅटोचा वापर करू शकतात. त्याचबरोबर अंजीर खाल्ल्याने केसांना खालील फायदे मिळतात.

पांढरे केसांची समस्या दूर होते (The problem of white hair is eliminated-Figs For Hair)

तुम्ही जर पांढऱ्या केसांच्या समस्येपासून त्रस्त असाल, तर तुम्ही तुमच्या आहारात अंजिराचा समावेश केला पाहिजे. अंजिराचे नियमित सेवन केल्याने केस नैसर्गिकरित्या काळे होतात. अंजीरामध्ये आढळणारे गुणधर्म पांढऱ्या केसांच्या समस्येवर मात करण्यास मदत करतात. त्याचबरोबर अंजिरामध्ये आढळणारे अँटिऑक्सिडंट गुणधर्म शरीराला निरोगी ठेवतात आणि फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण करतात.

केसांच्या वाढीस चालला मिळते (Promotes hair growth-Figs For Hair)

अंजीर आपल्या आरोग्यासोबतच केसांसाठी खूप उपयुक्त ठरू शकते. अंजिरामध्ये आढळणारे विटामिन सी आणि विटामिन ई यासारखे घटक केसांच्या वाढीस चालना देण्यास मदत करतात. त्याचबरोबर अंजिराचे नियमित सेवन केल्याने केस निरोगी आणि मजबूत होतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

Back to top button