Rohit Pawar | सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांची एकांतात चर्चा; राजकीय वर्तुळात तर्क – वितर्क

Rohit Pawar | मुंबई : शरद पवारांच्या ( Sharad Pawar ) राजीनाम्यानंतर राज्यभरात त्याचे पडसाद उमटले आहेत. पवारांनी राजीनामा दिलेल्या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( NCP) नेत्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून विरोध होत असल्याचं पाहायला मिळतं आहे. राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून पायउतार होत असताना त्यांनी सांगितलं आहे की, इथून पुढे कोणतीही निवडणूक लढवणार नाही. मी फक्त पुढील तीन वर्षे राजकारणात असेल लोकांचे प्रश्न नक्की सोडवण्याचा प्रयत्न करेल. तसचं योग्य वेळी भाकरी फिरवावी लागते, ती नाही फिरवली तर ती करपते, असं सुचकपणे शरद पवार म्हणाले होते. त्याच्या या निर्णयाविरोधात कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केलं. तर दुसऱ्या बाजूला शरद पवारांनी घोषणा केल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule) आणि रोहित पवार ( Rohit Pawar) यांची एकांतात बराच वेळ चर्चा झाली यावरून तर्क- वितर्क काढले जातात.

सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांची एकांतात चर्चा 

दरम्यान, या सगळ्या घडामोडींनंतर कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. या कार्यकर्त्यांना आवाहन करण्यासाठी सुप्रिया सुळे या स्वत: वाय.बी.चव्हाण सेंटरच्या बाहेर आल्या. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर सुप्रिया सुळे आणि रोहित पवार हे एकांतात एका झाडाखाली बसून चर्चा करत होते. पवारांनी एवढा मोठा निर्णय घेतल्यानंतर हे दोघे बराच वेळ चर्चा करत होते. या दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं असेल… त्यांच्यात काय चर्चा सुरू असेल…? याविषयी तर्क-वितर्क लढवण्यात येत आहेत. तसचं अजित पवार यांनी देखील बोलताना म्हटलं होत की, पवार साहेबांनी जो निर्णय घेतला आहे तो आज किंवा उद्या घ्यावा लागणार होताच. यामुळे सर्वांनी त्याला मंजुरी द्यावी. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी आम्ही नवंतरुणाला संधी देण्याचा विचार करत असल्याचं देखील अजित पवार यांनी म्हटलं आहे. यामुळे सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्यात नक्की काय चर्चा झाली याबाबत आजून काहीच माहिती मिळाली नाही. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी रोहित पवार यांना संधी मिळणार का? असे प्रश्न देखील उपस्थित केले जात आहेत.

Private discussion Supriya Sule and Rohit Pawar

तसचं शरद पवार यांनी घेतलेल्या या निर्णयापाठीमागे काय खेळी असू शकते का? याविषयी अंदाज बांधले जात आहेत. तर निर्णयाची घोषणा करता शरद पावस म्हणाले की, माणसाला अधिक मोह असू नये, आणि इतकी वर्ष संधी मिळाल्यानंतर आणखी मोह ठेवण्यासंबंधीची भूमिका मी काही कधी घेणार नाही. त्यामुळं तुम्हाला अस्वस्थता वाटेल, पण मी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत आहे. यामुळे आता सदस्यसमिती नेमून शरद पवार नक्की कोणाला संधी देणार? कोण असणार राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.