Eknath Shinde | रायगडच्या इर्शाळवाडीत हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू ऑपरेशन होणार, मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा

Eknath Shinde | रायगड: रायगड जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसापासून जोरदार पाऊस कोसळत आहे. सततच्या पावसामध्ये या भागात अनेक दुर्घटना घडताना दिसत आहे. यानंतर आता खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावात मोठी दुर्घटना घडली आहे. या वाडीवर दरड कोसळली आहे. या घटनेनंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे.

This is a settlement of 50 to 60 houses

काल रात्री (19 जुलै) रात्री सुमारे 10.30 ते 11 वाजता ही दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली (Eknath Shinde) आहे. रात्री गावातील लोक झोपेत असतानाच ही दुर्घटना घडली आहे.

खालापूरच्या इर्शाळगडावरील चौक गावापासून सुमारे 06 किलोमीटर डोंगर भागात मोरबे धरणाच्या वरच्या भागात ही आदिवासींची वाडी स्थित आहे. 50 ते 60 घरांची ही वस्ती आहे.

या घडलेल्या दुर्दैवी घटनेमध्ये काही जणांचा जीव गेला असल्याची माहिती मिळाली (Eknath Shinde) आहे. तर रात्री अख्ख गाव झोपलेलं असताना अचानक डोंगराचा काही भाग वस्तीवर कोसळला आहे. या दुर्घटनेमध्ये 200 ते 250 लोकसंख्या असलेलं गाव अख्ख मातीच्या ढिगाऱ्याखाली दबलं गेलं आहे.

दरम्यान, दुर्घटनास्थळी मदत कार्यासाठी अग्निशामक दल, रुग्णवाहिका, NDRT आणि TDRF दाखल झाले आहे. या ठिकाणी हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू ऑपरेशन करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली आहे.

या कोसळलेल्या दरडीखाली तब्बल 200 जण अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर आतापर्यंत या दुर्घटनेमध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.