Neelam Gorhe | मुंबई: भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात अंबादास दानवे यांनी हा मुद्दा उचलून धरला आहे. या पार्श्वभूमीवर दानवेंनी आज सभागृहात एक व्हिडिओचा पेनड्राईव्ह सादर केला आहे. याच पार्श्वभूमीवर उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) म्हणाल्या, “चॅनलच्या माध्यमातून हा सर्व प्रकार घराघरापर्यंत पोहोचला आहे. आपल्याला मिळालेले व्हिडिओ तुम्ही ब्लर करून प्रदर्शित करतात.
मात्र, हे व्हिडिओ प्रदर्शित करत असताना त्यात काय कृत्य चाललं आहे हे दिसेल अशा पद्धतीने दाखवा. असे व्हिडिओ दाखवत असताना थोडाफार बंधन ठेवा. जर कुणाकडे काही व्हिडिओ असतील तर त्यांनी पोलिसांना चौकशी करण्यासाठी ते व्हिडिओ पाठवावे. पोलिसांना चौकशीत या व्हिडिओची मदत होईल.”
It is very difficult to watch videos from pen drive – Neelam Gorhe
पुढे बोलताना त्या (Neelam Gorhe) म्हणाल्या, “अंबादास दानवे यांनी पेनड्राईव्ह सादर केला आहे. या पेनड्राईव्हमधील व्हिडिओ बघणे अत्यंत कठीण आहे.
मात्र, महिला पोलीस अधिकारी आणि महिला डॉक्टर यांच्यासह मी हे व्हिडिओ बघेल. त्याचबरोबर मी त्यांचं मत जाणून घेईल. परंतु या प्रकरणामध्ये महिलांची तक्रार आली पाहिजे. महिला भगिनींनी सभागृहावर विश्वास ठेवावा.”
दरम्यान, किरीट सोमय्या यांच्या या व्हिडिओ प्रकरणाची सखोल तपासणी करण्यात येईल असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. या प्रकरणाची चौकशी करत असताना कोणालाही पाठीशी घातलं जाणार नसल्याचं देखील देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्पष्टपणे सांगितलं (Neelam Gorhe) आहे.
महत्वाच्या बातम्या
- Ambadas Danve | किरीट सोमय्या व्हिडिओ प्रकरणावर अंबादास दानवेंनी सभागृहात सादर केला पेनड्राईव्ह
- Devendra Fadnavis | कुणालाही पाठीशी न घालता या प्रकरणाची चौकशी होणार; किरीट सोमय्या व्हिडिओ प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
- Bacchu Kadu | काही गोष्टींचा अतिरेक केला की त्याचे परिणाम भोगावे लागतात; किरीट सोमय्या व्हिडिओ प्रकरणावर बच्चू कडूंची प्रतिक्रिया
- Bacchu Kadu | मुख्यमंत्र्यांची अडचण दूर करण्यासाठी मी मंत्रिपदाचा दावा सोडला – बच्चू कडू
- Ambadas Danve | किरीट सोमय्या यांच्याविरोधात मी पुरावे सादर करेल; अंबादास दानवेंचा मोठा दावा