Ambadas Danve | किरीट सोमय्या व्हिडिओ प्रकरणावर अंबादास दानवेंनी सभागृहात सादर केला पेनड्राईव्ह

Ambadas Danve | मुंबई: किरीट सोमय्या (Kirit Somaiya) व्हिडिओ प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या कथित व्हिडिओमुळे किरीट सोमय्या यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

या व्हिडिओ प्रकरणावरून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विरोधक आक्रमक झाले आहे. या प्रकरणावरून अंबादास दानवे यांनी सभागृहात व्हिडिओचा पेनड्राईव्ह सादर केला आहे.

किरीट सोमय्या (Ambadas Danve) व्हिडिओ प्रकरणावर अंबादास दानवे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. यावेळी बोलत असताना अंबादास दानवे यांनी भारतीय जनता पक्षावर नाव न घेता टीका केली आहे.

ते म्हणाले, “राजकारणात काही असे लोक आहेत जे ईडीची, सीबीआयची भीती दाखवतात आणि महिलांना ब्लॅकमेल करतात आणि हीच लोक त्यांच्या पक्षातील महिला नेत्यांना पद देतात.

देशात जो राजकीय पक्ष नैतिकतेचे धडे देतो त्याच राजकीय पक्षाच्या एका मोठ्या नेत्याबाबत धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.”

पुढे बोलताना ते (Ambadas Danve) म्हणाले, “महिलांना त्रास देणारी व्यक्ती कोणत्या पक्षाची आहे हे महत्त्वाचं नाही, तर ही प्रवृत्ती महत्त्वाची आहे. काही महिलांनी हिंमत करून माझ्याकडे या विरोधात व्हिडिओ पाठवले आहे.

या नेत्यांनं काही महिलांच्या मजबुरीचा फायदा घेतलेला आहे. त्यांचे 8 तासाचे व्हिडिओ माझ्याकडे आहे. ते मी सभापतींना देणार आहे. ही व्यक्ती महाराष्ट्र द्रोही आहे.”

Marathi sisters are being exploited – Ambadas Danve

“मराठी भगिनींचं शोषण करणं सुरू आहे. महिलांचे शोषण करणारे दलाल या राज्यात आले आहे. हे लोक मराठी महिला भगिनींचा छळ करत आहे.

हे सर्व करणाऱ्या व्यक्तीचन नाव मी स्पष्टपणे घेतो. त्यांचं नाव किरीट सोमय्या. या महाराष्ट्र द्रोही माणसाचे व्हिडिओ असलेला एक पेनड्राईव्ह माझ्याकडे आहे”, असही ते यावेळी म्हणाले

दरम्यान, अंबादास दानवे यांनी सादर केलेल्या या पेनड्राईव्हनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या पेनड्राईव्हमध्ये नक्की काय आहे? अशा चर्चा देखील सुरू झाले आहेत. या माहितीनंतर किरीट सोमय्या यांच्या चिंतेत भर पडणार आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.