IPL 2024 Auction KKR – गौतम गंभीरसह ‘हे’ दिग्गज खेळाडू कोलकाता नाइट रायडर्स मध्ये खेळणार; वाचा खेळाडूंची यादी

Kolkata Knight Riders Players list | Gautam Gambhir KKR Mentor

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

IPL 2024 Auction KKR – आयपीएल 2024 साठी सर्व संघांसह सर्व खेळाडू तयारीला लागले आहे. कारण लवकरच आयपीएलचा १९ डिसेंबरला ( IPL 2024 ) लिलाव होणार आहे.

19 डिसेंबर 2023 रोजी दुबईमध्ये आयपीएलचा  ( IPL 2024 ) लिलाव पार पडणार आहे. या लिलावासाठी तब्बल 1166 खेळाडूंच्या नावांची नोंदणी झाली आहे.

यामध्ये 830 भारतीय खेळाडू आहेत. मात्र, यंदाच्या आयपीएल  ( IPL 2024 )  लिलावामध्ये सर्व संघांचं परदेशी खेळाडूंवर अधिक लक्ष राहणार आहे.

कोलकाता नाईट रायडर्स IPL 2021 उपविजेते ठरले होते. त्यानंतर KKR टीमला  भरीव कामगिरी करता आलेली नाही. मागील IPL ला  श्रेयस अय्यरला पाठीला दुखापत झाल्याने कर्णधारपद मिळाले नव्हते.

कोलकाता नाईट रायडर्स कडून नितीश राणाला संधी दिली होती परंतु नितीशला अपेक्षित अशी कामगिरी करता आलेली नाही. मागच्या IPL ला रिंकू सिंगने भरपूर मॅच-विनिंग खेळी खेळल्या, पण प्लेऑफसाठी KKR  पात्र होऊ शकला नव्हता.

गौतम गंभीर पुन्हा आता कोलकाता नाईट रायडर्सचा मार्गदर्शक म्हणून टीम सोबत दिसणार आहे. KKR साठी गंभीरने 2012 आणि 2014 च्या IPLस्पर्धेत कर्णधारपद भूषवले होते.

IPL 2024 KKR SQUAD

आंद्रे रसेल, अनुकुल रॉय, हर्षित राणा, जेसन रॉय, नितीश राणा, रहमान उल्ला गुरबाज, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, सुनील नरेन, सुयश शर्मा, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती, व्यंकटेश अय्यर.

१९ डिसेंबरला होणाऱ्या ( IPL 2024 ) लिलावापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सने 12 खेळाडूंना सोडले आहे. गेल्या दोन मोसमात प्लेऑफसाठी पात्र न ठरल्याने, KKR नवीन चेहऱ्याच्या शोधात आहे. .

सुनील नरेन आणि आंद्रे रसेल हे त्यांचे दिग्गज खेळाडू आहेत. त्यांना कायम ठेवण्याचे KKR ने ठरवले आहे. जेसन रॉय, रहमानउल्ला गुरबाज आणि श्रेयस अय्यर हे त्यांचे अनुभवी खेळाडू आहेत.

IPL 2024 Azmatullah Omarzai

अफगाणिस्तानचा अझमतुल्ला उमरझाईला KKR टीम घेण्यास उत्सुक असणार आहे. २०२३ च्या विश्वचषकात त्याने भरीव अशी कामगिरी केलेली आहे. त्याने आठ सामन्यांत 70.60 च्या सरासरीने आणि 97.78 च्या स्ट्राइक रेटने ३ अर्धशतके केली आहेत.  97 धाव त्याच्या सर्वोच्च आहेत तर त्याने विश्वचषकात 353 धावा केल्या.

शिवाय, त्याने 7.10 च्या इकॉनॉमी रेटने ७ विकेट्स घेतल्या. ओमरझाईला टी-20 फॉरमॅटमध्ये  62 सामन्यांमध्ये 22.61 च्या सरासरीने आणि 129.51 च्या स्ट्राइक रेटने केवळ 588 धावा केल्या आहेत ज्यात एक अर्धशतक आहे.

गोलंदाजीमध्ये ही त्याने चांगली कामगिरी करत 7.76 च्या इकॉनॉमी रेटने 59 विकेट्स घेतल्या आहेत. चांगली कामगिरी केली आहे. ओमरझाईने विश्वचषकात भारतीय खेळपट्टीवर चांगली कामगिरी केली आहे.  त्यामुळे लिलावात तो एक उपयुक्त ठरणार आहे.

Mitchell Starc IPL 2024

मिचेल स्टार्कने भारतीय खेळपट्टीवर चांगली कामगिरी केली आहे. स्टार्कने 10 सामन्यांत 6.06 च्या इकॉनॉमी रेटने 16 विकेट घेतल्या आहेत. KKR ने नेहमीच वेगवान गोलंदाजाला प्राधान्य दिले आहे.

शोएब अख्तर, शेन बाँड, ट्रेंट बोल्टपासून पॅट कमिन्सपर्यंत नाईट रायडर्सने वेगवान गोलंदाजाला प्राधान्य दिले आहे.

IPL 2024 Harshal Patel 

हर्षल पटेल याने 2021 मध्ये चांगली कामगिरी केली होती. त्याने सर्वाधिक बळी घेण्याच्या ड्वेन ब्राव्होच्या विक्रमाशी बरोबरी केली होती. हर्षल पटेलच्या नावावर 32 विकेट्स आहेत. शिवाय त्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध हार्दिक पांड्या, किरॉन पोलार्ड आणि राहुल चहर बाद करत हॅटट्रिक घेतली होती.

हर्षलने 2022 मध्ये 7.66 च्या इकॉनॉमी रेटने 19 विकेट्स घेतल्या, तर 2022 मध्ये त्याने 13 सामन्यांत 14 विकेट्स घेतल्या.

नाइट रायडर्सकडे हर्षित राणा आणि वैभव राणा हे वेगवान गोलंदाज आहेत, पण त्यांच्याकडे अनुभवाची कमतरता आहे. अनुभवाची कमतरता असल्यामुळे KKR  हर्षलसाठी उत्सुक असतील.

Kolkata Knight Riders Potential Targets IPL 2024 :

अजमतुल्ला मिर्झा, मिचेल स्टार्क, फिल सलाह, अकाल हुसेन, हर्षल पटेल , तस्किन अहमद, डॅरेल मिशेल, राज अंगद बो

हे वाचा –

IPL 2024 Auction : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) ‘या’ दिग्गज खेळाडूंना करणार खरेदी; मुंबई इंडियन्सच्या चिंतेत भर

IPL 2024 | यंदाच्या आयपीएलच्या लिलावामध्ये ‘या’ विदेशी खेळाडूंना असेल सर्वाधिक मागणी

IPL 2024 RCB Players List – रॉयल चॅलेंजर्स बंगलोरमध्ये खेळणार ‘हे’ दिग्गज खेळाडू; वाचा खेळाडूंची यादी

Indian Premier League Teams List  2024 – वाचा IPL सामन्यांच्या तारखा, संघांची यादी आणि खेळाडूंची नावे

IPL 2024 CSK Players List – चेन्नई सुपर किंग्स कडून दिग्गज भारतीय खेळाडूंना नारळ; वाचा यादी

Indian Premier League 2024 – लिलावात केदार जाधवला नापसंती? वाचा नापसंत खेळाडूंची यादी

IPL 2024 | वाचा संघांची यादी, कर्णधार, मालक, बजेट, आयपीएल सुरू होण्याची तारीख

महत्वाच्या बातम्या