Rahul Dravid – बीसीसीआयने राहुल द्रविडला मुख्य प्रशिक्षकपदी मुदतवाढ दिली पण…’; जय शहाला द्रविड टीममध्ये नको?

BCCI has given extension but...': Jay Shah puts timer on Rahul Dravid Jay Shah

Rahul Dravid – राहुल द्रविडच्या देखरेखीखाली, रोहित शर्माच्या टीम इंडियाने सर्वोत्तम कामगिरी केली आहे. द्रविडने 2021 मध्ये माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांची जागा घेतली होती.

त्यानंतर टीम इंडियाने गेल्या वर्षी T20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. या वर्षाच्या सुरुवातीला वर्ल्ड कप अंतिम फेरीत पोहचला. एकदिवसीय विश्वचषकात ऑस्ट्रेलिया विरुद्दच्या सामन्यात भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला.

एकदिवसीय विश्वचषकात भारतीय संघाने सर्वोत्तम कामगिरी केली आहे. सलग ११ सामन्यात भारताने विजय मिळवला. पण अंतिम सामन्यात भारताचा पराभव झाला. आणि विश्वचषकाची ट्रॉफी वर नाव कोरण्याची संधी भारताकडून गेली.

डिसेंबरमध्ये गेल्या आठवड्यात विश्वचषक आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्य प्रशिक्षक द्रविड ( Rahul Dravid ) म्हणाला, ‘बीसीसीआयशी ( BCCI ) अद्याप करार झालेला नाही.  बीसीसीआयकडून कागदपत्रे मिळाल्यावर करारावर स्वाक्षरी करेल.’ असे या द्रविडने सांगितले.

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला ( Rahul Dravid ) बीसीसीआयने हिरवा कंदील दिला असला तरी जय शाह ( Jay Shah ) कडून वेळेचे कारण सांगून टाळाटाळ करत असल्याचे बोलले जात आहे. एकदिवसीय विश्वचषकानंतर अजिबात वेळ मिळत नसल्याचं कारण जय शाह  सांगत आहेत.

दरम्यान,  जय शहाला याबद्दल विचारला असता ते म्हणाले, “आम्ही मुदतवाढ दिली आहे, परंतु आम्हाला अद्याप करार निश्चित करायचा आहे परंतु त्यासाठी अजिबात वेळ मिळाला नाही. माझी (जय शाह ) त्यांच्याशी (राहुल द्रविड) बैठक झाली आणि आम्ही परस्पर सहमत झालो.  दक्षिण आफ्रिकेतून परतल्यावर आम्ही बसून निर्णय घेऊ,” असे बीसीसीआयचे ( BCCI ) सचिव जय शाह यांनी सांगितले.

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना बीसीसीआयने ( BCCI ) मुदतवाढ दिली आहे पण जय शाह ( Jay Shah ) यांनी राहुल द्रविडच्या दुसऱ्या कार्यकाळावर टायमर लावल्याच्या चर्चा आहे. जय शाहला राहुल द्रविड टीममध्ये नको का ? असा प्रश्न क्रिकेटप्रेमी उपस्तिथ करत आहेत.

महत्वाच्या बातम्या 

 

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.