IND vs PAK U19: एशिया कप मध्ये पाकिस्तानने भारताला ८ विकेटने हरवले

Pakistan beat India by 8 wickets in asia cup 2023

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

IND vs PAK U19 – अझान अवेसच्या नाबाद शतकाच्या जोरावर पाकिस्तानने दुबईत झालेल्या अंडर-19 आशिया चषकाच्या साखळी सामन्यात भारताचा 8 गडी राखून पराभव केला.

या विजयासह पाकिस्तानने अ गटातील अव्वल स्थान मजबूत केले. साद बेगने 68 धावांची नाबाद खेळी खेळली. त्याने अवेस सोबत तिसऱ्या विकेटसाठी 105 धावांची शतकी भागीदारी केली.

अंडर-19 आशिया चषक ( IND vs PAK U19 ) स्पर्धेत पाकिस्तानने भारताचा आठ गडी राखून पराभव केला आहे. दुबईतील आयसीसी अकादमीच्या मैदानावर प्रथम फलंदाजी करताना भारताने नऊ गडी गमावून 259 धावा केल्या होत्या.

पाकिस्तानने 47 षटकांत दोन गडी गमावून हे कठीण लक्ष्य गाठले. अझान अवेसने नाबाद १०५ धावांची तर कर्णधार साद बेगने ६८ धावांची नाबाद खेळी खेळली. शमाईल हुसेन आठ धावा करून बाद झाला तर शाजेब खान 63 धावा करून बाद झाला.

याआधी भारताकडून तीन फलंदाजांनी अर्धशतकी खेळी खेळली. आदर्श सिंगने सर्वाधिक ६२ धावा केल्या. उदय सहारनने 60 आणि सचिन दासने 58 धावांचे योगदान दिले.

पाकिस्तानचा कर्णधार साद बेगने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.  ( IND vs PAK U19 )  पाकिस्तानकडून मोहम्मद जीशानने चार विकेट घेतल्या. आमिर हसन आणि उबेद शाह यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. अराफत मिन्हासने एक विकेट घेतली.

भारत अंडर-19: आदर्श सिंह, अर्शिन कुलकर्णी, रुद्र पटेल, उदय सहारन (c), मुशीर खान, सचिन धस, अरावेली अवनीश (विकेटकीपर), सौम्य पांडे, मुरुगन अभिषेक, राज लिम्बानी, नमन तिवारी.

पाकिस्तान अंडर-19: शमील हुसैन, शाहजेब खान, अजान अवैस, साद बेग (c), मोहम्मद जीशान, मोहम्मद रियाजुल्लाह, तैयब आरिफ, अराफात मिन्हास, अली असफंद, अमीर हसन, उबैद शाह.

महत्वाच्या बातम्या