IND Vs SA – क्रिकेट चाहत्यांसाठी वाईट बातमी! ‘हा’ दिग्गज खेळाडू दुखापतीमुळे पहिल्याच T20I सामन्यातून बाहेर

IND Vs SA Lungi Ngidi not played T20I match because of injury

IND Vs SA – भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या महिनाभराच्या दौऱ्यासाठी गेला आहे. आज भारताचा दक्षिण आफ्रिके विरुद्ध पहिली T20I सामना होणार आहे. भारत विरुद्धच्या पहिल्या T20I सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे, वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी (  Lungi Ngidi  ) दुखापतीमुळे सामन्यातून बाहेर पडला आहे.

एनगिडीला डाव्या पायाच्या घोट्याला मोच आली आहे. एनगिडी हा दक्षिण आफ्रिकेचा सलामीचा गोलंदाज आहे ज्याला भारत विरुद्धच्या ( IND Vs SA ) पहिल्या दोन T20I साठी निवडण्यात आले होते.

एनगिडीच्या जागी ब्युरन एरिक हेंड्रिक्सची नियुक्ती करण्यात आली आहे. तो डावखुरा वेगवान गोलंदाज आहे.  तो आतापर्यंत 19 T20I सामने खेळला आहे. पण तो दक्षिण आफ्रिकेसाठी दोन वर्षांहून अधिक काळ एकही टी-२० खेळलेला नाही.

भारत विरुद्धच्या ( IND Vs SA ) पहिल्या T20I सामन्यासाठी रबाडाची निवड करण्यात आली नाही कारण निवडकर्त्यांना त्याला कसोटीपूर्वी विश्रांती द्यायची होती.

भारतीय संघ कर्णधार हार्दिक पांड्याशिवाय टी-20 साठी दक्षिण आफ्रिकेत आहे. पांड्याच्या ( Hardik Pandya ) अनुपस्थितीत सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav ) संघाचे नेतृत्व करेल. त्याने नुकतेच घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियावर टी-20 मध्ये भारताला 4-1 ने मालिका जिंकून दिली.

पण दक्षिण आफ्रिकेला दक्षिण आफ्रिकेत हरवणे ही काही सोपी गोष्ट नाही. भारताकडे एक तरुण T20 संघ आहे आणि आशा आहे की, इशान किशन, रिंकू सिंग, अर्शदीप सिंग आणि रवी बिश्नोई या मालिकेत चांगले खेळ करतील.

India’s Squad For The T20I Series Vs South Africa ( IND Vs SA )

भारताचा T20I संघ: यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, रुतुराज गायकवाड, टिळक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), जितेश शर्मा (विकेटकीपर), रवींद्र जडेजा (vc), वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार

South Africa’s Squad For The T20I Series Vs India ( IND Vs SA )

दक्षिण आफ्रिका T20I संघ: एडन मार्कराम (कर्णधार), ओटनील बार्टमन, मॅथ्यू ब्रेट्झके, नांद्रे बर्गर, गेराल्ड कोएत्झी, डोनोव्हन फेरेरा, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅन्सन, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, डेव्हिड मिलर, बेउरान हेंड्रिक्स, शैहल्वे, शेल्वे, आणि ट्रिस्टन स्टब्स आणि लिझाड विल्यम्स

India Vs South Africa ( IND Vs SA ) Live Streaming Details

आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका ( IND Vs SA Live Streaming ) पहिली T20I सामनाचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर करण्यात येईल. तसेच Disney+Hotstar अॅप आणि वेबसाइटवर सामन्यांचे Live Streaming तुम्ही पाहू शकाल. संद्याकाळी ७ वाजल्यापासून सामन्याच्या थेट प्रक्षेपणला सुरवात होईल.

Read Also –India Vs South Africa: Full Schedule, Squads And Live Streaming Details

महत्वाच्या बातम्या 

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.