Free Aadhaar Card Update – आधार कार्डवरील नाव, पत्ता, जन्मतारीख मोफत बदलण्यासाठी फक्त ४ दिवस बाकी

Free Aadhaar Card Update: Change Name, Address, DOB

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Free Aadhaar card Update : प्रत्येक भारतीय नागरिकासाठी आधार कार्ड खूप महत्त्वाचे कागदपत्र आहे. त्यामुळे आधार कार्डवरील नाव, पत्ता, जन्मतारीख सर्व गोष्टी व्यवस्थित असणे खूप महत्त्वाचे आहे

आधार कार्डवरील नाव, पत्ता, जन्मतारीख मोफत बदलण्यासाठी फक्त ४ दिवस बाकी राहिले आहेत. आधार कार्डधारकांना त्यांचे तपशील मोफत अपडेट किंवा दुरुस्त करण्यासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) ने जाहीर केले की नागरिक आता 14 डिसेंबर 2023 पर्यंत कोणत्याही शुल्काशिवाय त्यांचे आधार कार्ड ऑनलाइन अपडेट करू शकतील.

यामुळे नागरिकांना मोफत myAadhaar पोर्टलवर आधार कार्ड अपडेट करता येईल.  https://myaadhaar.uidai.gov.in या अधिकृत वेबसाईट वर तुम्ही विनामूल्य आधार कार्ड करू अपडेट शकतात. मोफत सेवेची तारीख यापूर्वी अनेकदा वाढवण्यात आली आहे.

मोफत सेवा संपल्यानंतर आधार कार्ड अपडेटसाठी पैसे मोजावे लागतील.  50 रुपये पासून १५० रुपयांपर्यंत आधार कार्ड अपडेट  करण्यासाठी खर्च येतो.

तुम्हाला नाव, जन्मतारीख, पत्ता इ. अपडेट करायचे असल्यास, तुमच्याकडे दोन पर्याय आहेत. तुम्ही एकतर ऑनलाइन अपडेट करू शकता किंवा स्थानिक आधार केंद्राला भेट देऊ शकता, परंतु आधार केंद्रावर तुम्हाला यासाठी 50 रुपये पासून १५० रुपयांपर्यंत  शुल्क भरावा लागतो.

आधार कार्ड (Aadhar Card) अपडेट करत असताना तुमच्या मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक असणे महत्वाचे आहे. तरच तुम्ही ऑनलाईन आधार अपडेट करू शकता.

Update your Aadhaar Card Details for free

तुमचे आधार मोफत अपडेट करण्यासाठी खालील स्टेप्स फॉल्लो करा

  1. आधार अपडेट करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम मोबाईल नंबरच्या मदतीने लॉग इन करावे लागेल.
  2. लॉग इनसाठी तुम्हाला Https://Uidai.Gov.In/En/My-Aadhaar/Update-Aadhaar.Html या वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
  3. त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक प्रविष्ट करून ओटीपी टाकावा लागेल.
  4. ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट अपडेट करण्यासाठी डॉक्युमेंट सिलेक्ट करून व्हेरिफाय करावे लागेल.
  5. यानंतर तुम्हाला ड्रॉप लिस्टमध्ये तुमचा आयडी प्रूफ आणि ऍड्रेस प्रूफ स्कॅन करून अपलोड करावा लागेल.
  6. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला सबमिट बटनावर क्लिक करावे लागेल.नंतर तुम्हाला विनंती क्रमांक मिळेल आणि आधार अपडेट फॉर्म सबमिट केला जाईल.
  7. रिक्वेस्ट नंबरद्वारे तुम्ही तुमच्या आधार अपडेटची स्थिती जाणून घेऊ शकतात.

आधार कार्ड क्रमांक गेल्या दहा वर्षांत भारतीय नागरिकांसाठी खूप महत्वाचा झाला आहे. आधार ओळख अंदाजे 1,200 सरकारी उपक्रम आणि कार्यक्रमांमध्ये वापरला जातो. याव्यतिरिक्त, वित्तीय संस्था ग्राहकांना सहजतेने प्रमाणीकृत करण्यासाठी आणि ऑनबोर्ड करण्यासाठी आधारचा वापर करतात.

14 डिसेंबर 2023 पूर्वी तुमचे आधार तपशील विनामूल्य अपडेट करण्याची संधी गमावू नका.

महत्वाच्या बातम्या