🕒 1 min read
Sadabhau Khot vs Sharad Pawar । सदाभाऊ खोत यांनी जतमधील महायुतीच्या सभेत शरद पवार यांच्या आजारपणावरुन वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले “आता महाराष्ट्राचा चेहरा तुझ्या चेहऱ्यासारखा करायचा आहे का?. महाराष्ट्र बदलायचा आहे म्हणजे तुला कसला चेहरा पाहिजे?, अशी वादग्रस्त टीका सदाभाऊ खोत यांनी केली.
मात्र त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. त्याचा परिणाम महायुतीवर होईल, आणि त्याचा निवडणुकीत फटका बसेल, असे लक्षात येताच खोत यांनी महाराष्ट्राची तसेच पवारांची माफी मागितली आहे.
माफी मागताना खोत म्हणाले, ”माझा कुणाच्याही व्यंगत्वाकडे बघून बोलण्याचा हेतू नव्हता. ही गावगाड्याची भाषा आहे, पण काही लोकांनी त्या शब्दाचा अर्थाचा विपर्यास केला. त्यामुळे कोणाच्याही भावना दुखावल्या असतील तर मी ते शब्द मागे घेतो. मी दिलगिरी व्यक्त करतो.” असे खोत म्हणाले.
काय म्हणाले सदाभाऊ खोत ?
“अरे पवार साहेब, तुमच्या चिल्यापिल्याने कारखाने हाणले, बँका हाणल्या, सुतगिरण्या हाणल्या, पण पवारांना मानावं लागेल, एवढं घडलं तरी सुद्धा भाषणात म्हणतं, मला महाराष्ट्र बदलायचा आहे, मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे. कसला तुझा चेहरा? तुझ्या चेहऱ्यासारखा पाहिजे का? तुला कसला चेहरा पाहिजे?”, असे वादग्रस्त वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी केली.
पुढे बोलताना खोत म्हणाले, “राज्याची तिजोरी ही गाय आहे. ती गाय शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला पाहिजे. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसवाले यांनी देवेंद्र फडणवीस यांना का घेरलं? माहिती आहे का? तर ते काय म्हणत होते साहेबाला, गायीची जी कास आहे त्या कासेला चार थाणे आहेत. या अर्धा थाण वासराला पाजायचं म्हणजे आपल्याला, आणि साडेतीन थाणातलं दूध आपणच हाणायचं. देवेंद्र फडणवीस काय म्हणाले, चारही थाणे ही वासराचीच आहेत. मी सर्व दूध वासरालाच देणार. मग शरद पवार साहेबांना नऊवा महिना लागला आणि कळा सुटल्या”, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली.
महत्वाच्या बातम्या
- ‘शरद पवारला त्याच्या चेहऱ्यासारखा महाराष्ट्र बदलायचा आहे का?’; सदाभाऊ खोत यांच वादग्रस्त वक्तव्य
- नणंद बाईकडे खूप माल आहे, कडक नोटा आहेत; नवनीत राणांचा यशोमती ठाकूर यांच्यावर टीका
- विधानसभा निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज; ४ हजार १४० अंतिम उमेदवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now