Navneet Rana : “देवासमोर वाढलेलं ताट खाण्याचं काम माझ्या नणंद बाईने केलं. दहा वर्षे मतदारसंघाला मागे नेण्याचे काम माझ्या नणंद बाईने केलेले आहे. माझी नणंद बाई 3 टर्म पासून प्रतिनिधीत्व करत आहे.”
पुढे बोलताना नवनीत राणा म्हणाल्या, नणंदबाईंना फक्त नोटा आवडतात. बाकी कार्यकर्ते सतरंजी उचलतात. माझ्या नणंद बाईने जाती जातींमध्ये विभाजन करून मत घेतले आहेत. मेलेल्या माणसाच्या डोक्यावरचे लोणी खाण्याचा काम नणंद बाई करत आहे. एकही रोजगार उपलब्ध दिला नाही. नणंद बाईने खूप कमावले आहे. तिकीट देणार म्हणून दर्यापूरच्या उमेदवारचा घर लुटले, असा आरोपही नवनीत राणा यांनी केला.
खोटं एकच वेळ चालते डबल डबल चालत नाही. नणंद बाईकडे खूप माल आहे. कडक नोटा आहेत. दिले तर घ्याच खूप कमावले आहेत. निवडणुकीसाठी शेत विकावं लागतं म्हणते. कागदपत्रे दाखव कोणते शेत विकले? आज जो खासदार झाला तो वॉचमन झाला आहे. घरचा वॉचमन झाला आहे, 25 लाख लोकांचा खासदार आहे.
महत्वाच्या बातम्या