Share

नवनीत राणांचा मुलगा म्हणतो, मी कट्टर हिंदुत्त्ववादी, गोळी खाणार पण कुराण वाचणार नाही

After the Pahalgam terror attack, BJP leader Navneet Rana reignited the Hindutva debate, asserting strong sentiments against Pakistan while praising PM Modi’s leadership and India’s unity.

Published On: 

After the Pahalgam terror attack, BJP leader Navneet Rana reignited the Hindutva debate, asserting strong sentiments against Pakistan while praising PM Modi’s leadership and India’s unity.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थेट पाकिस्तानला इशारा देत, हल्लेखोरांना शिक्षा दिली जाईल, असे स्पष्ट केले. राज्यातील विविध नेत्यांनीही पाकिस्तानच्या विरोधात रोष व्यक्त केला आहे.

या हल्ल्यानंतर धार्मिक तणावाचीही काही ठिकाणी चर्चा रंगली आहे. दहशतवाद्यांनी धर्म विचारून हिंदूंना लक्ष्य केल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, हिंदू-मुस्लिम ऐक्याची उदाहरणेही अनेक ठिकाणी पाहायला मिळाली आहेत.

दरम्यान, भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी पहलगाम हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना आपले कट्टर हिंदुत्ववादाच्या भूमिकेवर ठाम असल्याचे पुन्हा एकदा सांगितले.  नवनीत म्हणाल्या की, “पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी कुराण वाचायला सांगितले, पण आमचे हिंदू बांधव गोळ्या खायला तयार झाले, कुराण वाचायला नाही.” यासोबतच त्यांनी आपल्या मुलाचा दाखला देत सांगितले की, “माझा मुलगाही म्हणतो की, गोळी खाईन पण कलमा वाचणार नाही.”

Pahalgam Attack: Navneet Rana Slams Pakistan

पाकिस्तानविरोधात घणाघात करताना नवनीत राणा म्हणाल्या, “भुट्टो जर हिंदूंना धमक्या देत असेल, तर भारतात मोदी आणि अमित शहा रूपी वाघ आहेत. पाकिस्तानला आता पाणीच नाही तर दानाही मिळणार नाही. मोदीजी भुट्टोसारख्यांना चांगलाच धडा शिकवतील.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही