🕒 1 min read
IPL 2025 च्या 46 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमनेसामने भिडले. अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात आरसीबीचा फलंदाज विराट कोहली आणि दिल्लीचा विकेटकीपर केएल राहुल यांच्यात वाद झाल्याचे पाहायला मिळाले. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
आरसीबीच्या डावातील आठव्या षटकात कुलदीप यादव गोलंदाजी करत असताना हा प्रकार घडला. रिपोर्ट्सनुसार, केएल राहुलने केलेल्या एका वक्तव्यावर विराट कोहली संतापला आणि स्टंप्सजवळ येत केएलसोबत वाद घालू लागला. विराटने हातवारे करत काही बोलले तर राहुलनेही स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. मात्र या वादाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
Virat Kohli vs KL Rahul Clash Video Viral | IPL 2025 News
या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सवर 6 विकेट्सने विजय मिळवला. दिल्लीने दिलेलं 163 धावांचं आव्हान आरसीबीने 18.3 षटकांत 165 धावा करत पूर्ण केलं. कृणाल पंड्या याने नाबाद 73 धावांची खेळी करत आरसीबीचा विजय सुनिश्चित केला. तर विराट कोहलीनेही 51 धावा करून महत्त्वाचं योगदान दिलं.
महत्वाच्या बातम्या
- ‘तो’ किस सीन कट कर म्हणाल्यावर निर्माता म्हणाला, ‘माधुरी, तुला त्यासाठी एक कोटी दिलेत!’
- “राखी सावंतचा काश्मीरसाठी आवाहन: घाबरू नका, आपण सर्वजण काश्मीरला जाऊ”
- “साजिद खानने मला घरी बोलावलं आणि म्हणाला आता कपडे काढून..”, अभिनेत्री नवीनाचे गंभीर आरोप