‘तो’ किस सीन कट कर म्हणाल्यावर निर्माता म्हणाला, ‘माधुरी, तुला त्यासाठी एक कोटी दिलेत!’

Madhuri Dixit regrets her bold scene with Vinod Khanna in ‘Dayavan’, despite the film’s commercial success.

Published On: 

Madhuri Dixit and Vinod Khanna’s Bold Scene in Dayavan | Controversy and Regret

मुंबई | २८ एप्रिल:

बॉलिवूडच्या बोल्ड सीनचा उल्लेख आला की, १९८८ साली प्रदर्शित झालेल्या ‘दयावान’ चित्रपटातील विनोद खन्ना आणि माधुरी दीक्षित यांच्या चर्चित सीनची आठवण आजही होते. या चित्रपटातील ‘आज फिर तुमपे प्यार आया है’ गाण्यातील इंटिमेट सीनमुळे त्यावेळी मोठा गोंधळ उडाला होता.

माधुरी दीक्षित आणि विनोद खन्ना यांच्यातलं किसिंग सीन शूट करताना विनोद खन्ना यांचा संयम सुटल्याची चर्चा रंगली होती. त्या काळात अनेक अभिनेत्री विनोद खन्नासोबत असे सीन करण्यास घाबरत होत्या. ‘दयावान’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर माधुरी दीक्षितला टीकेचा सामना करावा लागला.

सीन हटवण्याची मागणी करत माधुरीने चित्रपटाच्या निर्माते-दिग्दर्शक फिरोज खान यांना नोटीस पाठवली होती. मात्र फिरोज खान यांनी या मागणीला नकार देत सांगितले की, त्या सीनसाठी माधुरीला एक कोटी रुपये दिले आहेत आणि सीन हटवला जाणार नाही.

Madhuri Dixit and Vinod Khanna Bold Scene in Dayavan

चित्रपटाच्या कथेत विशेष दम नसल्याने निर्माता-दिग्दर्शकाने किसिंग सीनवरच जास्त भर दिला होता. विनोद खन्ना व माधुरी दीक्षित यांच्यात जवळपास २० वर्षांचं वयाचं अंतर असूनही या सीनमुळे ‘दयावान’ चांगलाच चर्चेत राहिला आणि बॉक्स ऑफिसवरही समाधानकारक कमाई केली.

नंतरच्या काळात माधुरी दीक्षितने हा सीन आपल्या कारकिर्दीतील एक चूक असल्याचे जाहीरपणे सांगितले. तरीही या चित्रपटामुळे माधुरी आणि फिरोज खान दोघांनाही मोठा फायदा झाला होता.

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही