Share

कृणाल पंड्याच्या शानदार खेळीने आरसीबीचा दिल्लीवर दणदणीत विजय, गुणतालिकेत अव्वल स्थान

“RCB beats Delhi Capitals by 6 wickets as Krunal Pandya unbeaten 73 and Virat Kohli’s fifty seal the win; RCB jumps to No. 1 spot in IPL 2025 points table.”

Published On: 

Krunal Pandya Match-Winning Knock, RCB Crushes Delhi by 6 Wickets | IPL 2025 Points Table

🕒 1 min read

Krunal Pandya | IPL 2025 च्या 46 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने दिल्ली कॅपिटल्सचा त्यांच्या घरीच 6 विकेट्सने पराभव केला. अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात दिल्लीने आरसीबीसमोर 163 धावांचं आव्हान ठेवलं होतं, जे आरसीबीने 18.3 षटकांत 4 विकेट्स गमावून पार केलं.

आरसीबीच्या विजयात ऑलराउंडर कृणाल पंड्या आणि विराट कोहली यांचा मोलाचा वाटा होता. कृणालने नाबाद 73 धावा करत सामन्याचा नायक ठरला, तर विराटने 51 धावा करून अर्धशतकांची हॅटट्रिक पूर्ण केली.

Krunal Pandya Match-Winning Knock | IPL 2025

दिल्लीच्या गोलंदाजांमध्ये कर्णधार अक्षर पटेलने 2 विकेट्स घेतल्या, तर दुष्मंथा चमीरा याला 1 यश मिळालं. त्याआधी दिल्लीने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 8 गड्यांच्या मोबदल्यात 162 धावा केल्या. केएल राहुलने सर्वाधिक 41 धावा केल्या, तर ट्रिस्टन स्टब्सने 34 आणि अभिषेक पोरेलने 28 धावांचं योगदान दिलं.

गोलंदाजीत आरसीबीकडून भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या, तर जोश हेझलवूडने 2 आणि यश दयाल व कृणाल पंड्याने प्रत्येकी 1 विकेट मिळवली. या विजयानंतर आरसीबीने 14 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये पहिले स्थान पटकावलं आहे. त्यामुळे प्लेऑफचं तिकीट मिळवण्यासाठी त्यांना केवळ आणखी एका विजयाची गरज आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही