Sushma Andhare | “हनुमान चालीसा म्हटल्यानं प्रश्न सुटले असते तर…”; सुषमा अंधारे यांची शिंदे गटावर खोचक टीका

Sushma Andhare | टीम महाराष्ट्र देशा: हनुमान चालीसा मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी हनुमान चालीसा मुद्द्यावरून ठाकरे गटावर शाब्दिक हल्लाबोल चढवला होता.

तर नवनीत राणा (Navneet Rana) यांनी देखील हनुमान चालीसाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे गटावर टीकास्त्र चालवलं होतं. या पार्श्वभूमीवर सुषमा अंधारे यांनी शिंदे गटावर टीका केली आहे. हनुमान चालीसा म्हटल्यानंतर प्रश्न सुटतात का? असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे.

People’s representatives should pay attention to people’s problems – Sushma Andhare

सुषमा अंधारे (Sushma Andhare) म्हणाल्या, “श्रीकांत शिंदे यांनी हनुमान चालीसा म्हटली आहे. मात्र, हनुमान चालीसाचे पाठ केल्याने देशातील प्रश्न सुटणार आहे का?

समृद्धी महामार्गावर गेलेले जीव हनुमान चालीसा म्हटल्यावर परत येतील का? त्याचबरोबर हनुमान चालीसाचे पाठ केल्याने जनतेचे प्रश्न सुटतील का?

जर असं होणार असेल तर आम्ही सर्व हनुमान चालीसा म्हणायला तयार आहोत. सत्ताधाऱ्यांनी सध्या कुठला मुद्दा कुठे नेऊन ठेवला आहे. लोकप्रतिनिधींनी जनतेच्या समस्यांकडे लक्ष द्यायला हवं. मात्र, तसं कधीच होत नाही.”

संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी महात्मा गांधी विषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून सुषमा अंधारे यांनी संभाजी भिडे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर देखील टीका केली आहे.

त्या (Sushma Andhare) म्हणाल्या, “संभाजी भिडे यांच्यासारखा माणूस महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करत आहे. त्यांचा कोणत्या प्रकारचा धर्म आहे. हा धर्म आम्ही कसा मान्य करायचा.

एखाद्या व्यक्तीने फेसबुकवर पोस्ट केली तर त्याच्यावर लगेच कारवाई होते. त्याचबरोबर त्या व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला जातो. मात्र, संभाजी भिडे यांना ते पाठीशी घालत आहे. त्यामुळं देवेंद्र फडणवीस कसले गृहमंत्री आहे.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.