Sanjay Raut | महाविकास आघाडीत फूट पडणार? संजय राऊतांनी स्पष्टचं सांगितलं

Sanjay Raut | मुंबई: अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकीय घडामोडींनी वेग धरला आहे. अजित पवारांनंतर (Ajit Pawar) शरद पवार (Sharad Pawar) देखील भाजप सोबत जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्या सातत्यानं बैठकी होताना दिसत आहे. या सर्व घटनानंतर महाविकास आघाडीमध्ये फूट पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Mahavikas Aghadi is standing strong – Sanjay Raut

प्रसार माध्यमांशी बोलत असताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “शरद पवार यांचं कुटुंब खूप मोठं आहे. त्यामुळं मी त्यांच्या कुटुंबाबद्दल जास्त काही बोलणार नाही.

मात्र, शरद पवार यांच्या कुटुंबाचा आम्ही राजकारणावर कोणत्याही प्रकारचा परिणाम होऊ देणार नाही. महाविकास आघाडी सध्या मजबुतीनं उभी आहे.

काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सध्या एकत्र आहे आणि ते कायम एकत्र राहणार. हे तिन्ही पक्ष महाविकास आघाडीमध्ये राहतील आणि इंडियामध्ये देखील कायम राहतील.

अजित पवार यांचं राजकारण त्यांच्याकडं आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही सोबत आहोत आणि कायम राहणार.”

शरद पवार आणि अजित पवार यांच्या बैठकीमध्ये अजित पवारांनी शरद पवारांना भाजपसोबत येण्याची ऑफर दिली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

यावर प्रतिक्रिया देत संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “अजित पवार एवढे मोठे नेते नाही की ते शरद पवारांना ऑफर देऊ शकतात.

शरद पवारांनी अजित पवारांना घडवलं आहे. अजित पवारांनी शरद पवारांना नाही. शरद पवार यांचा राजकीय अनुभव 60 वर्षापेक्षा अधिक आहे.

त्यामुळं शरद पवार यांचं पद आणि मान खूप मोठा आहे. त्यामुळं अजित पवार, हसन मुश्रीफ यांच्यासारखे ज्युनिअर लोक शरद पवारांना ऑफर देऊ शकत नाही.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.