Vijay Wadettiwar | टीम महाराष्ट्र देशा: 02 जुलै 2023 रोजी राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला होता. या दिवशी अजित पवार (Ajit Pawar) शरद पवार (Sharad Pawar) यांची साथ सोडून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले होते.
त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्या या शपथविधीनंतर अजित पवार राज्याचे भावी मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. याच पार्श्वभूमीवर विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मोठं विधान केलं आहे.
BJP needs Sharad Pawar – Vijay Wadettiwar
प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले, “शरद पवार आणि अजित पवार यांच्या वारंवार भेटी होत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडून सुद्धा भाजपची परिस्थिती सुधारत नाही.
त्यामुळं भाजपला शरद पवारांची गरज आहे. लोकसभेतील आकडा वाढवण्यासाठी भाजप शरद पवार यांच्या मागं लागलं आहे. म्हणून नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी अजित पवारांना एक अट घातली आहे.
शरद पवार आपल्यासोबत आले तरच अजित पवारांना मुख्यमंत्री पद मिळेल, असं नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळं अजित पवार शरद पवारांना भाजपसोबत जाण्याचा आग्रह धरत आहे.”
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्या सातत्यानं बैठकी सुरूच आहे. शनिवारी म्हणजेच 12 ऑगस्ट रोजी संध्याकाळी शरद पवार आणि अजित पवार यांची एक गुप्त बैठक पार पडली.
या बैठकीमध्ये अजित पवारांनी शरद पवारांना भाजपसोबत जाण्याची ऑफर दिली असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या.
भाजपनं शरद पवारांना केंद्रीय कृषिमंत्री पद आणि नीती आयोगाचे अध्यक्ष पदाची ऑफर दिली असल्याची माहिती देखील मिळाली होती. या माहितीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- Rohit Pawar | रोहित पवारांच्या हाती खेकडा; शिंदे गटावर साधना निशाणा
- Devendra Fadnavis | बडबड्या विरोधकांना पागलखाण्यात पाठवायचे का?- देवेंद्र फडणवीस यांची टोलेबाजी
- Job Vacancy | महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीत (MES) विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
- Job opportunity | महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळात (MIDC) नोकरीची संधी! आजच करा अर्ज
- Uddhav Thackeray | “सत्ताधाऱ्यांच्या नकली हिंदुत्वाच्या वरवंट्याखाली…”; स्वातंत्र्य दिनानिमित्त ठाकरे गटाचा मोदी सरकारवर हल्लाबोल