Chhagan Bhujbal । वा रे वा चोंग्यांनो, म्हणत भुजबळांनी मराठा आंदोलकांना डिवचलं

Chhagan Bhujbal VS Maratha Protester Manoj Jarane Patil

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Chhagan Bhujbal । मंत्री छगन भुजबळ यांची इंदापूर येथे सभा झाली. सभेत त्यांनी मनोज जरांगे पाटील आणि मराठा आंदोलकांवर सडकून टीका केली आहे. मराठा समाजाला दिलेले कुणबी सर्टिफिकेट ( Kunbi Caste Certificate ) लगेच रद्द करा अशी मागणीही भुजबळ यांनी केली आहे.

इंदापूर सभेत भुजबळ म्हणाले, ‘अतिवृष्टी झाली तिथे मी गेलो. लोकांनी मला काळे झेंडे दाखवले. गो बॅक गो बॅक दाखवलं. मी जिथून गेलो तिथे गोमूत्र शिंपडले. होय आम्ही शूद्र आहोत म्हणून तुम्ही कुणबी प्रमाणपत्र मागता का? वा रे वा चोंग्यांनो’, असे म्हणत भुजबळांनी टीका केली.

एकदा कुणबी प्रमाणपत्र मिळाले तर तो ओबीसी झाला. अशीच यांची दादागिरी राहणार आहे. एका शाळेत दाखल्यात सगळीकडे कुणबी लिहले आहे. जाळपोळ करणाऱ्या लोकांना पिस्तुल सोबत पकडले.

तो पिस्तुल सरपंच कुणाचा, हे सगळ्यांना माहिती आहे. आणि जरांगे म्हणतात आमच्या लेकरांना पकडले, असे भुजबळ म्हणाले.

मराठा कुणबी सर्टिफिकेट लगेच रद्द करा

मराठ्यांना कुणबी सर्टिफिकेट( Kunbi Caste Certificate )  द्यायचे सुरु आहे ते थांबवा. न्यायमूर्ती शिंदे सगळीकडे जात आहेत आणि करून ( कुणबी सर्टिफिकेट ) घेत आहेत. आमच्या 27 टक्केंतील आरक्षण दिले पाहिजे. पण ओबीसी मधून आरक्षण देता कामा नये. हे जर ऐकू कुणाला गेलं नाही, न्याय आपल्याला मिळाला नाही. तर सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है.. असंच करावे लागेल.

इंदापूर सभेतील छगन भुजबळ यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे वाचण्यासाठी लिंक वर क्लीक करा- https://bit.ly/3t9hTEg

महत्वाच्या बातम्या