Share

Chhagan Bhujbal । मराठा कुणबी सर्टिफिकेट लगेच रद्द करा; छगन भुजबळांची मोठी मागणी

Chhagan Bhujbal Comment On Kunbi Caste Certificate | maratha reservation । Chhagan Bhujbal । maratha aarakshan । OBC Reservation | Chhagan Bhujbal News in Marathi | Latest News, Photos and Videos on Chhagan Bhujbal

Published On: 

🕒 1 min read

Chhagan Bhujbal । इंदापूर  येथील सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका केली. मी ( छगन भुजबळ ) काही बोललो की, काही विद्वान लोक बोलायला लागतात की दोन जातीत भांडणे लागत आहेत. जरांगे यांच्या सभा रात्री उशिरा चालते, पोलीस कारवाई करीत नाही.

कायदा फक्त आपल्याला त्यांना नाही. मी 15 दिवसांनी एकदा बोलतो, सौ सुनार की एक लोहार… काही बोलावे लागते, सगळंच ऐकून घ्यायची सवय नाही.  राज्यात अशांतता निर्माण कोण करते? असा सवाल भुजबळांनी उपस्थित केला

मराठा समाजाला दिलेले कुणबी सर्टिफिकेट ( Kunbi Caste Certificate ) लगेच रद्द करा. त्यांना ओबीसी आरक्षण न देता वेगळे आरक्षण द्या. आमच्या ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देऊ नका, आमची इतर कोणताही मागणी नाही, असेही भुजबळ इंदापूर  येथील सभेत म्हणाले.

मराठ्यांना कुणबी सर्टिफिकेट( Kunbi Caste Certificate )  द्यायचे सुरु आहे ते थांबवा. न्यायमूर्ती शिंदे सगळीकडे जात आहेत आणि करून ( कुणबी सर्टिफिकेट ) घेत आहेत. आमच्या 27 टक्केंतील आरक्षण दिले पाहिजे. पण ओबीसी मधून आरक्षण देता कामा नये. हे जर ऐकू कुणाला गेलं नाही, न्याय आपल्याला मिळाला नाही. तर सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है.. असंच करावे लागेल.

शिंदे समिती बरखास्त करण्याच्या मागणीवर छगन भुजबळ ठाम असल्याचे इंदापूर  येथील सभेत दिसले.

इंदापूर सभेतील छगन भुजबळ यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे 

तू ( मनोज जरांगे  ) अक्कलेने दिव्यांग झाला

आमच्या आरक्षणाला धक्का लावू नका.. आम्ही फक्त हेच मागतोय. बहुतांश क्षेत्रात मराठा समाजाचे लोक आहेत. आम्ही जर पुढे गेले तरी ते आमची लायकी काढत आहेत.

नारायण कुचे यांच्यावर जरांगे यांना टिंगल केली, असे म्हणत भुजबळांनी जरांगे यांची ऑडीओ क्लिप ऐकून आणि वाचून दाखवली, त्यानंतर मिमिक्रीही केली. तू अक्कलेने दिव्यांग झाला आहे, अशी टीका भुजबळांनी केली.

सरपंच होऊन दाखव; छगन भुजबळांचे जरांगेंना चॅलेंज  (Chhagan Bhujbal VS Manoj Jarane Patil )

जरांगेची सभा होती म्हणून अधिकर्यांनी सुट्टी जाहीर केली. अधिकर्यांना अधिकारी म्हणून वागणूक असली पाहिजे. तो येवल्याचे एडपट म्हणतो. 1985 साली त्यांचा जन्म झाला होता की नाही त्यावेळी महापौर आणि आमदार झालो होते. तू ( Manoj Jarange )  ग्रामपंचायत सरपंच होऊन दाखव.

आमचा संयम संपला तर…

घनसावंगी येथे नेत्यांना गावबंदी आणि त्याच शेजारी रोहित पवार यांचे स्वागत. त्याच गावात एका तरुणाने प्रश्न विचारला तर तो दुसऱ्या दिवशी दवाखान्यात होता, त्याला मारहाण केली. पोलिसांना सांगितले गाव बंदीचं बोर्ड काढा पण काढले नाहीत.

आमचा संयम संपला तर क्रोधाला कुणीही आवर घालू शकत नाही.. त्यामुळे पोलिसांनी , सरकारनं लवकर लक्ष घालावे, असे भुजबळ ( Chhagan Bhujbal ) म्हणाले.

वा रे वा चोंग्यांनो, म्हणत भुजबळांनी मराठा आंदोलकांना डिवचलं 

अतिवृष्टी झाली तिथे मी गेलो. लोकांनी मला काळे झेंडे दाखवले. गो बॅक गो बॅक दाखवलं. मी जिथून गेलो तिथे गोमूत्र शिंपडले. होय आम्ही शूद्र आहोत म्हणून तुम्ही कुणबी प्रमाणपत्र मागता का? वा रे वा चोंग्यांनो, असे म्हणत भुजबळांनी टीका केली.

एकदा कुणबी प्रमाणपत्र मिळाले तर तो ओबीसी झाला. अशीच यांची दादागिरी राहणार आहे. एका शाळेत दाखल्यात सगळीकडे कुणबी लिहले आहे. जाळपोळ करणाऱ्या लोकांना पिस्तुल सोबत पकडले.

तो पिस्तुल सरपंच कुणाचा, हे सगळ्यांना माहिती आहे. आणि जरांगे म्हणतात आमच्या लेकरांना पकडले, असे भुजबळ म्हणाले.

हिंम्मत जर हारलात तर मातीमोल व्हाल

24 डिसेंबरनंतर भुजबळ, सरकारला बघतो म्हणतो. सरकार पण ऐकून घेतो.  हिंम्मत जर हारलात तर मातीमोल व्हाल. म्हणून भीतीला मारा, असे भुजबळांनी आव्हान केले.

प्रकाश आंबेडकर यांचे आम्ही आभारी आहोत. पवार साहेबांना आणि इतर नेत्यांना मला सांगायचे आहे. तुमचा राग माझ्यावर असू शकतो पण माझा राग ओबीसी वर काढू नका. तुम्ही ओबीसी लढाई लढलात. पण वाचवण्यासाठी पण तुम्हीच यायला पाहिजे राग काढण्याची ही वेळ नाही, असे भुजबळ म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!