Eknath Shinde । एकनाथ शिंदेंना हटवण्याचं ठरलं, त्यावर शिंदे गटातील 23 आमदारांच्या सह्या

गुलाबराव पाटील, उदय सामंत, केसरकर, दादा भुसे अश्या 23 आमदारांच्या सह्या

Eknath Shinde | MLA Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी (Shiv Sena MLA Disqualification Case) सुरू असून आज दोन सत्रांत सुनावणी पार पाडणार पडली.

पहिल्या सत्रातील सुनावणीत ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडेंच्या उलट तपासणी दरम्यान देवदत्त कामत यांनी एक अटेंडंटशिट सादर केली.

ही अटेंडट शीट 21 जून 2022 रोजी वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीची होती. या अटेंडंटशिटवर, शिंदे गटातील तब्बल 23 आमदारांच्या सह्या आहेत. या बैठकीत एकनाथ शिंदे यांना गटनेता पदावरून हटवण्याबाबत प्रस्ताव मांडण्यात आला होता, त्यावर गुलाबराव पाटील, उदय सामंत, केसरकर, दादा भुसे अश्या 23 आमदारांच्या सह्या आहेत.

सुनील प्रभू यांनी 21 जून 2022 व्हीप जारी करून 21 जून च्या बैठकीसाठी हजर राहण्याचे सूचना होत्या. बैठकीत एकूण 23 आमदारांनी उपस्थिती होती.

एकनाथ शिंदेंना हटवण्याच्या ठरावावर 23 जणांच्या सह्या 

एकनाथ शिंदेंना गटनेता पदावरून हटवण्याबाबत झालेल्या बैठकीत गुलाबराव पाटील, संजय राठोड, संतोष बांगर, दादा भुसे, दिलीप लांडे, मंगेश कुडाळकर, सदा सरवणकर, योगेश कदम, उदय सामंत, दीपक केसरकर हे सर्व आमदार उपस्थित होते.

या बैठकीत एकनाथ शिंदे यांना गटनेचे पदावरून हटवण्याबाबत प्रस्ताव मांडण्यात आला ज्याला या आमदारांनी अनुमोदन दिले होते.

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.