Travel Tips | हिवाळ्यात भटकंतीला जाण्याचा प्लॅन करत आहात? तर भारतातील ‘या’ ठिकाणांना द्या भेट

Many people like to wander in winter

Travel Tips | टीम महाराष्ट्र देशा: हिवाळ्यामध्ये खूप लोकांना भटकंती करायला आवडतं. कारण या ऋतूमध्ये फिरण्यासाठी अत्यंत अनुकूलन वातावरण असतं.

त्यामुळे या रम्य वातावरणात तुम्ही जर फिरायला ( Travel Tips ) जाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही खाली दिलेल्या रम्य ठिकाणांना भेट देऊ शकतात.

या ठिकाणी तुम्हाला निसर्गाचा निवांत आनंद घेता येईल. तुम्ही जर फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही भारतातील खालील ठिकाणांना भेट देऊ शकतात.

बिनसार, उत्तराखंड ( Binsar, Uttarakhand-Travel Tips )

डिसेंबर महिन्यामध्ये तुम्ही जर फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर उत्तराखंड राज्यामध्ये स्थित असलेले बिनसार शहर तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतं.

या ठिकाणी खूप अल्हाददायक वातावरण असतं. या शहरामध्ये दाखल झाल्यावर तुम्हाला एका वेगळ्याच विश्वात आल्यासारखं वाटेल.

बिनसार हे शहर अल्मोडापासून 33 किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी तुम्हाला निवांत निसर्गाचा आनंद लुटता येईल.

श्रीनगर, काश्मीर ( Srinagar, Kashmir-Travel Tips )

हिवाळ्यामध्ये फिरायला जाण्यासाठी श्रीनगर हा एक सर्वोत्तम पर्याय आहे. श्रीनगरमध्ये तुम्ही दाल लेकला निवांत संध्याकाळ एन्जॉय करू शकतात.

त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला मनस्तोक्त भटकंती करता येईल. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या श्रीनगर शहरामध्ये दाखल होताचं तुमचा आनंद दुप्पट होऊन जाईल.

दार्जिलिंग ( Darjeeling-Travel Tips )

दार्जिलिंगला हिल्स स्टेशनची राणी म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी तुम्ही निवांत फिरण्यासह ॲवेंचर ॲक्टिव्हिटीचा देखील आनंद घेऊ शकतात.

त्याचबरोबर या ठिकाणी असलेले चहाचे मळे तुम्हाला मंत्रमुग्ध करून टाकतील. हे ठिकाण निसर्गरम्य आणि शांत आहे. त्यामुळे तुम्हाला जर तुमची सुट्टी शांततेत घालवायची असेल तर दार्जिलिंग तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

महत्त्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.