Virat Kohli | विराट कोहली का नाही? नोव्हेंबरच्या ‘प्लेअर ऑफ द मंथ’ नामांकनावरून चाहत्यांनी उपस्थित केला सवाल

ICC has announced the list of Player of the Month nominations

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Virat Kohli | टीम महाराष्ट्र देशा: नुकतीच एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा 2023 संपली आहे. या स्पर्धेनंतर आयसीसीने प्लेयर ऑफ द मंथ नामांकनाची यादी जाहीर केली आहे.

या यादीमध्ये टीम इंडियाचा मोहम्मद शमी ( Mohammed Shami ), ग्लेन मॅक्सवेल ( Glenn Maxwell ) आणि ट्रॅव्हीस हेड ( Travis Head ) यांचा समावेश आहे.

एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेमध्ये आपल्या बॅटने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विराट कोहलीचं ( Virat Kohli )  या यादीत नाव नाही. विराट कोहलीला ( Virat Kohli ) वगळण्यात आल्यामुळे चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Mohammed Shami took the most wickets in the World Cup

विश्वचषक स्पर्धेमध्ये भारतीय संघातील गोलंदाज मोहम्मद शमी याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहे. त्याच्या मेहनतीचे फळ त्याला मिळताना दिसत आहे.

कारण नोव्हेंबर महिन्याच्या आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ नामांकन यादीमध्ये त्याच्या नावाचा समावेश आहे. तर दुसरीकडे विश्वचषक स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्लेन मॅक्सवेल आणि ट्रॅव्हीस हेड यांचा देखील या यादीमध्ये समावेश आहे.

या स्पर्धेमध्ये भारतीय संघातील फलंदाज विराट कोहली ( Virat Kohli ) याने देखील स्फोटक फलंदाजी केली आहे. तरी देखील विराट कोहली ( Virat Kohli ) च्या नावाचा या यादीमध्ये समावेश नाही.

या सर्व घडामोडीनंतर भारतीय क्रिकेट प्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. या यादीमध्ये विराट कोहलीचं ( Virat Kohli ) नाव का नाही? असा सवाल चाहत्यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 नंतर टीम इंडिया लवकरच टी-20 विश्वचषक स्पर्धा खेळणार आहे. जून 2024 मध्ये ही स्पर्धा खेळली जाणार आहे.

या स्पर्धेसाठी विराट कोहली ( Virat Kohli ) बीसीसीआयची पहिली पसंती नसल्याच्या चर्चा सुरू आहे. विराट कोहली ऐवजी इशान किशन ( Ishan Kishan ) क्रमांक तीन वर खेळू शकतो, अशा चर्चा सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या