ICC Rankings | वनडे क्रमवारीत विराट कोहलीसह ‘या’ दोन खेळाडूंची झेप

ICC Rankings | टीम महाराष्ट्र देशा: आयसीसी (ICC) ने बुधवारी म्हणजेच 11 जानेवारी रोजी खेळाडूंची नवीन क्रमवारी (Rankings) जाहीर केली आहे. या क्रमवारीमध्ये टीम इंडियातील रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli) आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohommad Siraj) फायदा झाला आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये विराट कोहलीने शानदार शतक झळकावले होते. त्याला या शतकाचा आयसीसी यादीमध्ये फायदा झाला आहे.

एकदिवसीय सामन्याच्या फलंदाजी क्रमवारीत विराट कोहली दोन स्थानांनी वर आला आहे. सध्या तो या यादीमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे. आयसीसी रँकिंग यादीमध्ये टॉप-10 मध्ये टीम इंडियातील दुसरा फलंदाज रोहित शर्मा देखील सामील आहे. या यादीमध्ये रोहित शर्मा आठव्या क्रमांकावर आहे.

टीम इंडियातील रन मशीन म्हणजेच विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्ध झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये 87 चेंडूमध्ये 113 धावा करत शतक झळकावले होते. तर, कर्णधार रोहित शर्माने या सामन्यांमध्ये 67 चेंडू मध्ये 83 धावा केल्या होत्या. या सामन्यामध्ये मोहम्मद सिराजने 2 विकेट्स घेतल्या होत्या. टीम इंडियाने हा सामना 68 धावांनी आपल्या नावावर केला.

आयसीसी फलंदाजी रँकिंगमध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ एका स्थानाने खाली घसरला आहे. तो सातव्या क्रमांकावर येऊन पोहोचला आहे. तर इंग्लंडचा खेळाडू जॉनी बेअरस्टो देखील 2 स्थानांनी घसरून 9 व्या क्रमांकावर आला आहे. या यादीमध्ये पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम अव्वल स्थानावर आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.