Screen Guard | टीम महाराष्ट्र देशा: आजकाल जवळपास प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीकडे मोबाईल (मोबाईल) आहे. कारण मोबाईलच्या माध्यमातून अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. त्याचबरोबर या स्मार्टफोनमध्ये आपल्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी दडलेल्या असतात. म्हणून आपण त्याची अधिक काळजी घेत असतो. मोबाईलची काळजी घेण्यासाठी लोक त्याच्यावर विविध प्रकारचे स्क्रीन गार्ड (Screen Guard) लावत असतात. कारण स्क्रीन गार्ड लावल्याने मोबाईल अधिक सुरक्षित राहतो. तुम्ही पण जर मोबाईलला नवीन स्क्रीन गार्ड लावण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला स्क्रीन गार्ड लावताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे याबद्दल माहिती सांगणार आहोत.
मोबाईलनुसार स्क्रीन गार्ड खरेदी करा
स्क्रीन गार्ड खरेदी करताना तुमचा फोन आणि त्याचा वापर या गोष्टी लक्षात ठेवून स्क्रीन गार्ड खरेदी केलं पाहिजे. तुम्ही जर फोनचा अधिक वापर करणार असाल तर तुम्ही फोनला टेम्पर्ड ग्लास बसू शकतात. कारण टेम्पर्ड ग्लास फोनची अधिक सुरक्षा करतात.
योग्य स्क्रीन गार्ड निवडा
बाजारामध्ये दोन प्रकारचे स्क्रीन गार्ड उपलब्ध असतात. यामध्ये प्लास्टिक आणि टेम्पर्ड ग्लासचा समावेश आहे. प्लास्टिक स्क्रीन गार्ड फोनचे चांगले संरक्षण करते आणि ते कमी किमतीत बाजारात उपलब्ध असते. तर, टेम्पर्ड ग्लास स्क्रीनला अधिक सुरक्षितता प्रदान करते. टेम्पल ग्लासची किंमत प्लास्टिक ग्लासपेक्षा अधिक असते.
ऑनलाइन स्क्रीन गार्ड खरेदी करताना रिव्ह्यू चेक करा
तुम्ही जर तुमच्या मोबाईल साठी ऑनलाईन स्क्रीन गार्ड खरेदी करत असाल, तर इतर वापरकर्त्यांनी दिलेले रिव्यू पाहायला विसरू नका. कारण इतर वापरकर्त्यांनी दिलेले रिव्ह्यू बघून तुम्हाला योग्य ते स्क्रीन गार्ड निवडण्यास मदत होईल. ऑनलाइन स्क्रीन गार्ड खरेदी करताना त्यामध्ये सेन्सरसाठी पंच होल आणि कटआउट आहेत का ते नक्की तपासा.
महत्वाच्या बातम्या
- Chitra Vagh & Urfi Javed | चित्रा वाघ उर्फी जावेद वादावर मोठी बातमी; भाजपकडून…
- Ramdas Kadam | “माझ्या मुलाचा अपघात घडवून त्याला…”; रामदास कदमांचा खळबळजनक दावा
- Health Care Tips | दिवसभराचा थकवा दूर करण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश
- Hasan Mushrif | मोठी बातमी! हसन मुश्रीफ यांच्या कागल आणि पुण्यातील घरावर ईडीची छापेमारी
- Rishabh Pant | रिषभ पंत आयपीएलमधून बाहेर! सौरभ गांगुली यांनी केला खुलासा