Share

Health Care Tips | दिवसभराचा थकवा दूर करण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

🕒 1 min read Health Care Tips | टीम महाराष्ट्र देशा: वातावरणामध्ये सतत बदल होताना दिसत आहे. या बदलत्या हवामानाचा परिणाम थेट आपल्या आरोग्यावर (Health) होत असतो. त्याचबरोबर आपल्याला दिवसभर थकवा जाणायला लागतो. काही परिश्रम केल्यानंतर शरीरात थकवा जाणवणे ही एक सामान्य गोष्ट आहे. मात्र शरीराच्या हालचाली न करता थकवा जाणवणे हे आरोग्यासाठी घातक ठरू … Read more

Published On: 

🕒 1 min read

Health Care Tips | टीम महाराष्ट्र देशा: वातावरणामध्ये सतत बदल होताना दिसत आहे. या बदलत्या हवामानाचा परिणाम थेट आपल्या आरोग्यावर (Health) होत असतो. त्याचबरोबर आपल्याला दिवसभर थकवा जाणायला लागतो. काही परिश्रम केल्यानंतर शरीरात थकवा जाणवणे ही एक सामान्य गोष्ट आहे. मात्र शरीराच्या हालचाली न करता थकवा जाणवणे हे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. अनेकांना काहीही न करता थकवा जाणवतो आणि आळशी वाटते. शरीरामध्ये पोषक घटकांची कमतरता भासू लागल्यास, असे व्हायला लागते. त्यामुळे नेहमी पोषक आहार घेतला पाहिजे. दिवसभराचा थकवा दूर करायचा असेल तर तुम्ही आहारामध्ये पुढील गोष्टींचा समावेश करू शकतात.

मसूर

मसुराच्या डाळीमध्ये भरपूर प्रमाणात आयरन उपलब्ध असते. आयरन रक्तातील ऑक्सिजन आणि हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी खूप महत्त्वाचे असते. जेव्हा मानवी शरीरात हिमोग्लोबिन किंवा रक्ताची कमतरता असते तेव्हा शरीराला थकवा अधिक जाणवतो. त्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिन आणि रक्ताची पातळी नियंत्रणात ठेवणे खूप महत्त्वाचे असते. या पातळ्या नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात डाळींचा समावेश करू शकतात.

केळी

केळी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. केळीला फायबर आणि पोटॅशियमचा एक उत्तम स्त्रोत मानला जातो. केळीचे नियमित सेवनाने शरीरातील अशक्तपणा थकवा इत्यादी समस्या दूर होऊ शकतात.

अक्रोड

अक्रोडामध्ये ओमेगा 3 उपलब्ध असते. ओमेगातील शरीरातील जळजळ आणि तणाव कमी करण्यास मदत करते. अतिरिक्त तणाव घेतल्यामुळे शरीरातील थकवा वाढतो. त्यामुळे तणाव कमी झाल्यावर थकवा आपोआप दूर होऊ शकतो.

विटामिन डी युक्त पदार्थ

शरीरामध्ये विटामिनच्या कमतरतेमुळे अशक्तपणा आणि थकवा जाणवायला लागतो. सूर्यप्रकाश हा विटामिन डी चा सर्वोत्तम स्त्रोत मानला जातो. त्यामुळे दिवसभर ताजतावाने राहायचं असेल, तर दिवसातून किमान 20 मिनिटे सूर्यप्रकाशात घालवले पाहिजे. शरीरामध्ये विटामिन डी ची कमतरता भरून निघाल्यास थकवा आणि अशक्तपणाची समस्या दूर होऊ शकते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

[emoji_reactions]

Health

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या