Prithvi Shaw | पृथ्वीचा शानदार शो! झळकावले त्रिशतक

Prithvi Shaw | गुवाहाटी: मुंबईचा सलामीवीर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याने रणजी करंडक (Ranji Trophy) मध्ये आपल्या कारकिर्दीतील पहिले त्रिशतक झळकावले आहे. आसामविरुद्ध सुरू असलेल्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी त्याने हे त्रिशतक झळकवले आहे. या खेळीनंतर त्याने प्रथम श्रेणी क्रिकेट कारकिर्दीतील सर्वात मोठी धावसंख्या केली आहे. तब्बल 326 चेंडूमध्ये त्यानेही धाव संख्या उभी केली आहे.

मुंबई आणि आसाम यांच्यामध्ये सुरू असलेल्या रणजी सामन्याचा आज दुसरा दिवस आहे. या सामन्यामध्ये पहिल्या दिवशी पृथ्वी शॉ 260 धावा केल्या होत्या. दुसऱ्या दिवशी त्याने पुढच्या 60 धावा इतक्या वेगाने केले की 300 धावा केव्हा पूर्ण झाल्या, हे समजलेच नाही.

या खेळीनंतर पृथ्वी शॉ दीर्घ स्वरूपाच्या स्थानिक स्पर्धेत शतक झळकावणारा 2017 नंतरचा पहिलाच फलंदाज ठरला आहे. या खेळीनंतर पृथ्वीचा स्ट्राईक रेटही चांगला वाढला आहे. आसामविरुद्ध त्रिशतक झळकावून पृथ्वी शॉने सगळ्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे.

दरम्यान, पृथ्वीच्या खेळी अजून सुरू आहे. ही बातमी आसामसाठी चांगली नसली, तरी क्रिकेटच्या त्यांनाही बातमी आनंद देत आहे. कारण पृथ्वी जेवढी मोठी खेळी खेळेल, तेवढे तो विक्रम मोडत जाईल.

आयपीएलमध्ये ऋषभ पंतच्या अनुपस्थितीमध्ये पृथ्वीच्या दिल्ली कॅपिटल चे नेतृत्व करू शकतो. पृथ्वी शॉबद्दल जर बोलायचे झाले, तर त्याच्याकडे कर्णधार पद सांभाळण्याचा अनुभव आहे. या युवा खेळाडूने अंडर-19 क्रिकेटमध्ये कर्णधार पद सांभाळले आहे. या युवा खेळाडूकडे फारसा अनुभव नसला, तरी तो संघाचे नेतृत्व उत्कृष्ट पद्धतीने करू शकतो.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.