Skin Care Tips | चेहऱ्यावर मुलतानी माती आणि कडुलिंब लावल्याने मिळतात ‘हे’ अनोखे फायदे

Skin Care Tips | टीम महाराष्ट्र देशा: आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे आणि वाढत्या प्रदूषणामुळे त्वचेशी (Skin) संबंधित अनेक समस्या निर्माण होत असतात. या समस्यांवर मात करण्यासाठी लोक अनेक प्रकारच्या पद्धतींचा अवलंब करतात. त्याचबरोबर या समस्यांवर मात करण्यासाठी अनेकजण रसायनयुक्त उत्पादनांचा वापर करतात. पण या रसायनयुक्त उत्पादनामुळे चेहऱ्याला हानी पोहोचण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे चेहऱ्यावरील समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी नैसर्गिक पद्धतींचा वापर केला पाहिजे. यासाठी तुम्ही मुलतानी माती आणि कडुलिंबाचा वापर करू शकतात. मुलतानी माती आणि कडुलिंबाचा नियमित वापर केल्याने चेहऱ्यावरील डाग, मुरूम, सुरकुत्या इत्यादी समस्या दूर होतील. कारण यामध्ये अँटीऑक्सीडेंट, अँटी इम्प्लिमेंटरी आणि अँटीबॅक्टरियल गुणधर्म आढळतात. हे गुणधर्म त्वचेवरील समस्यांवर मात करण्यास मदत करतात.

मुलतानी माती आणि कडुलिंबाचा फेसपॅक बनवण्यासाठी तुम्हाला एक चमचा मुलतानी मातीमध्ये अर्धा चमचा कडुलिंबाच्या पानांची पेस्ट मिसळून घ्यावी लागेल. त्यानंतर तयार झालेल्या या पेस्टमध्ये काही थेंब गुलाब जल मिसळून घ्या. हे मिश्रण व्यवस्थित तयार झाल्यावर चेहऱ्यावर आणि मानेभोवती लावून वीस मिनिटे राहू द्या. हे मिश्रण पूर्णपणे कोरडे झाल्यानंतर चेहरा सामान्य पाण्याने स्वच्छ धुवा. हे मिश्रण नियमित त्वचेवर लावल्यास पुढील फायदे मिळू शकतात.

कोरड्या त्वचेसाठी फायदेशीर

कडुलिंब आणि मुलतानी माती यांचा फेसपॅक नियमित चेहऱ्यावर लावल्याने कोरडेपणाची समस्या दूर होऊ शकते. त्याचबरोबर याच्या नियमित वापराने त्वचेवरील हरवलेली चमक परत येऊ शकते. कडुलिंब आणि मुलतानी मातीचा फेस पॅक त्वचेवरील डेड स्किन देखील काढून टाकतो.

डाग कमी होऊ शकतात

चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी मुलतानी माती आणि कडुलिंबाचा फेसपॅक उपयुक्त ठरू शकतो. कारण यांच्यामध्ये आढळणारे गुणधर्म त्वचेला स्वच्छ करून त्वचेवरील डाग दूर करतात. आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा फेस पॅक चेहऱ्यावर लावल्याने तुम्हाला तुमच्या चेहऱ्यामध्ये फरक जाणवेल.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या