Share

Golden Globe Award 2023 | ‘RRR’च्या ‘नाटू नाटू’ गाण्यानं जिंकलं सर्वांचं मन, ठरलं बेस्ट ओरिजनल सॉंग

Golden Globe Award 2023 | कॅलिफोर्निया:  एस एस राजामौली यांनी दिग्दर्शित केलेला RRR चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाणं जगभर गाजलं होतं. आता या गाण्याने हॉलीवुडच्या सर्वोच्च पुरस्कारांपैकी एक असलेला गोल्डन ग्लोब पुरस्कार (Golden Globe Award) आपल्या नावावर केला आहे. दिग्दर्शक एस एस राजामौली, जूनियर एनटीआर आणि रामचरण यांच्यासाठी नवीन वर्षाची सुरुवात अतिशय चांगली झाली होती. कारण वर्षाच्या सुरुवातीलाच ‘RRR’ या चित्रपटाला ऑस्कर पुरस्कारासाठी शॉर्टलिस्ट करण्यात आले आहे. त्यानंतर आता या चित्रपटातील गाण्याला बेस्ट ओरिजनल साँगसाठी गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला आहे.

दिग्दर्शक एस एस राजामौली, जूनियर एनटीआर आणि रामचरण यांनी या पुरस्कार सोहळ्यामध्ये ‘RRR’ चित्रपटाचे प्रतिनिधित्व केलं. या चित्रपटामध्ये ज्युनिअर एनटीआर आणि रामचरण यांच्याशिवाय आलिया भट आणि अजय देवगन यांनी देखील महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटामध्ये 1920 मधील ब्रिटिशकालीन भारतातील स्वातंत्र्य सेनानी कोमाराम भीम आणि अल्लुरी सीतारामाराजू यांची कथा दाखवण्यात आली होती.

‘नाटू नाटू’ हे गाणं एम एम केरावणी यांनी कंपोज केलं आहे. त्यांनीच या गाण्याला पुरस्कार जाहीर झाल्यावर मंचावर जाऊन ट्रॉफी घेतली. त्यानंतर त्यांनी पुरस्कारासह स्टेजवर फोटोसाठी पोज देखील दिल्या. ‘नाटू नाटू’ हे गाणं बेस्ट सॉंग (मोशन पिक्चर) या कॅटेगरीमध्ये नामांकित करण्यात आलं होतं.

‘RRR’ या चित्रपटाने जागतिक पातळीवर 1200 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली होती. या चित्रपटाने अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार आपल्या नावावर केले आहे. त्याचबरोबर वर्षाच्या सुरुवातीलाच हा चित्रपट ऑस्कर पुरस्कारासाठी देखील शॉर्टलिस्ट झाला आहे.

महत्वाच्या बातम्या

Golden Globe Award 2023 | कॅलिफोर्निया:  एस एस राजामौली यांनी दिग्दर्शित केलेला RRR चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. या चित्रपटातील ‘नाटू …

पुढे वाचा

Entertainment

Join WhatsApp

Join Now