Bachchu Kadu | अमरावती: गेल्या काही दिवसांपासून राजकारणात अपघाताची मालिका सुरू आहे. आमदार जयकुमार गोरे, आमदार धनंजय मुंडे, आमदार योगेश कदम यांच्या कारचा अपघात झाला होता. अशा परिस्थितीमध्ये आमदार बच्चू कडू यांचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. अमरावतीमध्ये बच्चू कडू (Bachchu Kadu) अपघात झाला आहे. अमरावतीच्या खासगी रुग्णालयामध्ये त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रस्ता ओलांडत असताना दुचाकीने त्यांना धडक दिली आहे. या अपघातामध्ये ते गंभीर जखमी झाले आहे.
आज सकाळी रस्ता ओलांडत असताना बच्चू कडू यांचा अपघात झाला आहे. दुचाकीस्वाराने त्यांना धडक दिल्याने त्यांना या अपघाताला सामोरे जावे लागले आहे. या अपघातामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. अमरावती येथील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांच्या डोक्याला, हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याचबरोबर त्यांच्या डोक्याला चार टाके पडल्याची माहिती मिळाली आहे.
आज सकाळी रस्ता क्रॉस करताना माझा अपघात झाला. माझी प्रकृती ठीक असुन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला विश्रांतीची गरज आहे. कृपया सर्व हितचिंतकांना विनंती की कोणीही भेटायला येऊ नये.
— BACCHU KADU (@RealBacchuKadu) January 11, 2023
एका महिन्यामध्ये राज्यातील तीन आमदारांच्या कारचा अपघात झाला आहे. डिसेंबर महिन्यात भाजप आमदार जयकुमार मोरे यांच्या कारचा भीषण अपघात झाला होता. त्यानंतर 4 जानेवारी रोजी राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे यांचा अपघात झाला होता. या अपघातामध्ये धनंजय मुंडे यांना गंभीर जखमा झाल्या होत्या.
त्याचबरोबर शिंदे गटाचे आमदार रामदास कदम यांचे सुपुत्र योगेश कदम यांचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. मात्र सुदैवाने या अपघातामध्ये कोणत्याही प्रकारची दुखापत त्यांना झाली नव्हती. आता या अपघातांच्या मालिकेमध्ये बच्चू कडू यांचे नाव जोडले गेले आहे.
महत्वाच्या बातम्या
- Golden Globe Award 2023 | ‘RRR’च्या ‘नाटू नाटू’ गाण्यानं जिंकलं सर्वांचं मन, ठरलं बेस्ट ओरिजनल सॉंग
- Weather Update | तापमानात पुन्हा घसरण, रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता
- Sanjay Raut | “हे म्हणतात शरद पवारांमुळे शिवसेना फुटली, पण हे स्वप्न तर…”; संजय राऊतांचे गंभीर आरोप
- Manisha Kayande | “होता वशिला म्हणून गाता आलं म्हशीला” – मनीषा कायंदे
- Gopichand Padalkar | “माझी औकात काढणाऱ्यांना मी बारामतीत जाऊन…”; पडळकर नेमकं काय म्हणाले?