Rakhi Sawant | राखी सावंतने बांधली लग्नगाठ? बॉयफ्रेंड आदिलसोबत वरमाळा घातलेले फोटो झाले व्हायरल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Rakhi Sawant | मुंबई: बॉलीवूडमधील ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) सतत चर्चेत असते. सध्या राखी सावंत आणि तिचा बॉयफ्रेंड आदिल दुर्राणी यांच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या आहे. कारण या दोघांनी गळ्यात वरमाळा घातलेले फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामुळे या दोघांच्या लग्नाच्या चर्चेला उधाण आलं आहे. या लग्नाविषयी राखी किंवा आदिलकडून कुठलीही अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र, हे फोटो बघून असा अंदाज बांधता येत आहे की, या दोघांनी लग्न केलं आहे.

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये राखी पारंपारिक ड्रेस मध्ये दिसत आहे. या फोटोमध्ये तिचा बॉयफ्रेंड आदिल सुद्धा आहे. या दोघांच्या गळ्यामध्ये वरमाळा दिसत आहे. त्याचबरोबर एका फोटोमध्ये दोघांनी मॅरेज सर्टिफिकेट हातात घेतलेले आहे. या फोटोसोबत या दोघांचा मॅरेज सर्टिफिकेट सुद्धा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

राखी सावंत ने 2019 मध्ये रितेशसोबत लग्न केलं होतं. हे दोघेजण बिग बॉसमध्ये झळकले होते. 2022 मध्ये हे दोघे वेगळे झाले होते. त्यानंतर राखी सावंत आणि आदिल एकमेकांना डेट करत असल्याचे चर्चा सुरू झाल्या होत्या.

राखी सावंत आणि आदिलला अनेकदा एकत्र पाहिलं गेलं आहे. आदिल राखीपेक्षा वयाने सहा वर्षांनी लहान आहे. त्याच्याबद्दल एका मुलाखतीमध्ये राखी सावंत बोलताना म्हणाली होती, “देवाने आदीला माझ्यासाठी पाठवल आहे. रितेशसोबत ब्रेकअप झाल्यानंतर मी नैराश्यामध्ये होते. तेव्हा त्या कठीण काळात आदिल माझ्या आयुष्यात आला.”

महत्वाच्या बातम्या