Rishabh Pant | ऋषभ पंत आयपीएलमधून बाहेर! सौरभ गांगुली यांनी केला खुलासा

Rishabh Pant | कोलकाता: भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंत (Rishabh Pant) याचा 30 डिसेंबरला सकाळी भीषण अपघात (Accident) झाला होता. या करा अपघातामध्ये तो गंभीर जखमी झाला होता. मात्र, आता त्याच्या प्रकृतीमध्ये झपाट्याने सुधारणा होत आहे. त्याच्यावर डेहरादून येथे प्राथमिक उपचार करण्यात आले होते. त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी मुंबईत हलवण्यात आले होते.

या अपघातामध्ये ऋषभ पंतच पायाला गंभीर दुखापत झाली होती. सहा जानेवारी रोजी त्याच्या पायाच्या लिगामेंटवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेनंतर त्याला मैदानात परतण्यासाठी किमान सहा महिने लागतील, असे मानले जात आहे. अशा परिस्थितीमध्ये तो आयपीएल खेळेल की नाही? असा प्रश्न उपस्थित झाला होता. या प्रश्नाचे उत्तर बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरभ गांगुली (Saurabh Ganguli) यांनी स्पष्टपणे दिले आहे.

सौरभ गांगुली यांनी सांगितले आहे की, “ऋषभ पंत आयपीएल 2023 खेळू शकणार नाही. त्याला या दुखापतीतून सावरायला वेळ लागणार आहे. त्याच्या अनुपस्थितीचा दिल्ली कॅपिटल्स वर मोठा परिणाम होणार आहे.” कोलकाता येथे माध्यमांशी बोलताना सौरभ गांगुली यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे. ऋषभ पंतच्या अनुपस्थितीमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार कोण असेल? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार कोण असेल या प्रश्नावर सौरभ गांगुली म्हणाले, “अद्याप संघाचे नेतृत्व कोण करेल याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. मात्र, लवकरच याबाबत घोषणा केली जाणार आहे.” 2019 मध्ये दिल्ली कॅपिटल सौरभ गांगुली यांच्या मार्गदर्शनाखाली होता. सध्या सौरभ गांगुली दिल्ली कॅपिटल्स संघाचे क्रिकेट संचालक आहे.

ऋषभ पंतला या अपघातामुळे क्रिकेटमधून मोठा ब्रेक घ्यावा लागणार आहे. तो टीम इंडियाच्या वेळापत्रकातून बाहेर होऊ शकते. त्याच्या दुखापतीचे गांभीर्य पाहता तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या 4 कसोटी मालिका आणि एक दिवसीय मालिकेसाठी अनुपस्थित राहणार, असे मानले जात आहे. 9 फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4 सामन्यांची कसोटी मालिका सुरू होणार आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.