T20 World Cup | टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत कुणाला स्थान मिळणार; पुण्याच्या मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडला की यशस्वी जयस्वालला?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

T20 World Cup | टीम महाराष्ट्र देशा: वनडे वर्ल्ड कप 2023 ही स्पर्धा संपल्यानंतर टीम इंडियाने टी-20 विश्वचषक स्पर्धा 2024 ची तयारी सुरू केली आहे. या स्पर्धेसाठी ( T20 World Cup ) टीम इंडियामध्ये स्थान पक्के करण्यासाठी सर्व खेळाडू जोरदार प्रयत्न करत आहे.

त्याचबरोबर टी-20 संघात ( T20 World Cup )  स्थान मिळवण्यासाठी प्रत्येक खेळाडू आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणार आहे.

याच पार्श्वभूमीवर आकाश चोप्रा ( Akash Chopra ) यांनी वक्तव्य केलं आहे. टी-20 विश्वचषक ( T20 World Cup ) संघामध्ये स्थान मिळवण्यासाठी ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad ) आणि यशस्वी जयस्वाल ( Yashasvi Jaiswal ) यांच्यामध्ये चढ-उतार असणार आहे.

Rituraj Gaikwad and Yashasvi Jaiswal have performed well in Ind vs Aus T20 – Akash Chopra

आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलत असताना आकाश चोप्रा म्हणाले, “ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या टी-20 मालिकेमध्ये ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जयस्वाल यांनी अत्यंत चांगली कामगिरी केली आहे.

त्यानंतर दोन्ही खेळाडूंची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी निवड झाली आहे. अशात टी-20 विश्वचषक संघ ( T20 World Cup ) स्थान मिळवण्यासाठी दोन्ही खेळाडूंमध्ये किंचित चढ-उतार होऊ शकते. कारण ऋतुराज गायकवाड पेक्षा यशस्वी जयस्वाल थोडासा पुढे आहे.”

दरम्यान, आयपीएल 2024 मध्ये उत्कृष्ट कामगिरी आणि कौशल्य प्रदर्शित करत काही खेळाडू टी-20 संघात ( T20 World Cup ) स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न करताना दिसणार आहे.

यामध्ये संजू सॅमसन ( Sanju Samson ), वॉशिंग्टन सुंदर ( Washington Sundar ), जितेश शर्मा ( Jitesh Sharma ), अर्षदीप सिंग ( Arshdeep Singh ) इत्यादी खेळाडूंचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या