Travel Tips | निसर्ग सौंदर्याचा जवळून अनुभव घ्यायचा आहे? तर ‘या’ ठिकाणांना द्या भेट

Travel Tips | टीम महाराष्ट्र देशा: भारतातील प्रत्येक राज्यामध्ये काही ना काही खास आहे. प्रत्येक राज्यामध्ये सुंदर आणि आकर्षक पर्यटन स्थळ आहेत.

अशात तुम्ही पण निसर्गसौंदर्याचा सर्वोत्तम अनुभव घेण्यासाठी फिरायला ( Travel Tips ) जाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही योग्य बातमी वाचत आहात.

कारण या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला भारतातील काही सुंदर आणि आकर्षक ठिकाणांबद्दल माहिती सांगणार आहोत. निसर्गाचा सर्वोत्तम अनुभव घेण्यासाठी तुम्ही खालील ठिकाणांना भेट देऊ शकतात.

पहलगाम, काश्मीर ( Pahalgam, Kashmir-Travel Tips )

तुम्हाला जर शांततेत निसर्ग सौंदर्याचा ( Travel Tips ) आनंद घ्यायचा असेल तर काश्मीरमधील पहालगाम हे तुमच्यासाठी सर्वोत्तम ठिकाण ठरू शकते.

या ठिकाणी गेल्यावर तुम्हाला एखाद्या परदेशात गेल्यासारखे वाटेल. या ठिकाणी तुम्ही बेताब व्हॅली, तुलियन सरोवर, अरु व्हॅली इत्यादी ठिकाणांना भेट देऊ शकतात. या ठिकाणाला तुम्ही डिसेंबर ते एप्रिल दरम्यान भेट देऊ शकतात.

कुमारकोम, केरळ  ( Kumarakom, Kerala-Travel Tips )

कुमारकोम हे केरळ राज्यामध्ये वसलेलं सुंदर ठिकाण आहे. या ठिकाणी तुम्ही निसर्गसौंदर्याचा ( Travel Tips )  निवांत आनंद घेऊ शकतात.

त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही हाऊस बोटमध्ये बसून बॅकवॉटरचा आनंद घेऊ शकतात. या ठिकाणी तुम्ही वॉटर स्पोर्ट्स देखील खेळू शकतात. हिवाळ्यामध्ये या ठिकाणाला भेट देऊ शकतात.

महाबळेश्वर, महाराष्ट्र  ( Mahabaleshwar, Maharashtra-Travel Tips )

महाराष्ट्रातील महाबळेश्वर हे एक सुंदर आणि आकर्षक ठिकाण ( Travel Tips ) आहे. या ठिकाणी तुम्ही मेप्रो गार्डन, एलिफंट पॉइंट, महाबळेश्वर व्ह्यू पॉईंट इत्यादी ठिकाणांना भेट देऊ शकतात.

त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला मनसोक्त स्ट्रॉबेरीचा आनंद लुटता येऊ शकतो. महाबळेश्वरमध्ये फ्रेश स्ट्रॉबेरी उपलब्ध असते. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला स्ट्रॉबेरीच्या विविध पदार्थांचा आस्वाद घ्यायला मिळेल.

किन्नौर, हिमाचल प्रदेश  ( Kinnaur, Himachal Pradesh-Travel Tips )

या हिवाळ्यामध्ये तुम्हाला निसर्ग सौंदर्य आणि बर्फृष्टीचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही शिमला आणि मनालीला भेट न देता किन्नौरला भेट देऊ शकतात. या ठिकाणी गर्दी नसते.

त्यामुळे येथे तुम्ही निवांत निसर्ग सौंदर्याचा अनुभव घेऊ शकतात. या ठिकाणाहून तुम्हीच स्पिती व्हॅलीला देखील जाऊ शकतात. किन्नौरमध्ये दाखल झाल्यानंतर तुम्हाला एका वेगळ्याच विश्वात आल्यासारखा भास होईल.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.