Ajit Pawar | हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणावर चर्चा होणार का? अजित पवार म्हणतात…

Ajit Pawar | नागपूर: राज्यामध्ये मराठा समाज आरक्षण ( Maratha reservation ) मिळवण्यासाठी आंदोलन करत आहे. मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचं आंदोलन सुरू आहे.

या मुद्यावर तोडगा काढण्यासाठी मराठा समाजाने राज्य शासनाला 24 डिसेंबर पर्यंत मुदत दिली आहे. आरक्षण मिळाल्याशिवाय थांबणार नाही, असा इशारा मराठा समाजाने राज्य शासनाला दिला आहे.

अशात आजपासून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. या अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणावर चर्चा होणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे.

या प्रश्नावर अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी उत्तर दिलं आहे. विरोधकांनी मांडलेल्या विषयावर आम्ही चर्चा करायला तयार आहोत, असं अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी म्हटलं आहे.

अजित पवार ( Ajit Pawar ) म्हणाले, “काल चहापानाच्या कार्यक्रमाला विरोधक अनुपस्थित होते. त्यांनी त्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला.

मात्र, अधिवेशनामध्ये विरोधक जी मागणी करतील त्या सर्व विषयावर राज्य शासन चर्चा करायला तयार आहे. त्याचबरोबर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून एकमताने ठराव झाला आहे. मराठा समाजाला टिकणार आरक्षण मिळावं, यासाठी समितीचं काम आणि अभ्यास सुरू आहे.”

The farmers of the state will be helped at the earliest – Ajit Pawar

दरम्यान, राज्यामध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं  असून शेतकरी संकटात सापडला आहे.

या पावसामुळे शेतकऱ्यांची उभी पिकं वाया गेली आहे. या मुद्द्यावर बोलत असताना अजित पवार ( Ajit Pawar ) म्हणाले, “नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे तयार करायला सांगितले आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा विषय मांडला आहे. राज्यातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करता यावी, या संदर्भात चर्चा झाली आहे.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.