Weather Update | कुठं थंडी तर कुठं पावसाची शक्यता; पाहा हवामान अंदाज

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे. डिसेंबर महिन्यात देशासह राज्यातील बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.

तर काही ठिकाणी थंडीचा जोर वाढताना दिसत आहे. अशात हवामान विभागाने ( Weather Update ) नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

कारण राज्यातील वातावरणात पुन्हा एकदा बदल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली  ( Weather Update ) आहे.

A low pressure area has formed in the Bay of Bengal

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. या कमी दाबाच्या पट्ट्याचं मिचॉन्ग नावाच्या चक्रीवादळात रूपांतर झालं आहे.

हे चक्रीवादळ आंध्र प्रदेश किनारपट्टीला धडकलेलं असून आंध्र प्रदेशसह तामिळनाडूला देखील याचा मोठा झटका बसला आहे.

दोन्ही राज्यामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. तर त्याचबरोबर या चक्रीवादळाचे पडसाद राज्यात  ( Weather Update ) देखील दिसून आले आहे.

वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, आणि गोंदिया या सहा जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता  ( Weather Update ) आहे.

तर उद्यापासून म्हणजेच 8 डिसेंबर पासून या ठिकाणी थंडीला सुरुवात होणार असल्याचा हवामान खात्याने  ( Weather Update ) म्हटलं आहे.

Bell Papper Benefits

दरम्यान, डिसेंबर महिन्यात आपल्याला हवामानात  ( Weather Update ) अनेक बदल झालेले दिसले आहेत. अशात या बदलत्या हवामानात आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी घेणं खूप गरजेचं असतं.

आरोग्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात शिमला मिरचीचा समावेश करू शकतात. शिमला मिरचीचे नियमित सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात.

शिमला मिरचीचे सेवन केल्याने डोळे निरोगी राहतात, अशक्तपणा दूर होतो, वजन कमी होते, कॅन्सरचा धोका कमी होतो, त्याचबरोबर शरीराला विटामिन मिळते.

महत्वाच्या बातम्या