Sanjay Manjrekar | “विराट कोहलीने युवा फलंदाजासमोर स्वतःला सिद्ध केल्यानंतर…”; विराटच्या पुनरागमनावर मांजरेकर स्पष्टच बोलले

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sanjay Manjrekar | टीम महाराष्ट्र देशा: एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर टीम इंडियाने टी-20 विश्वचषक स्पर्धेची तयारी सुरू केली आहे.

अशात भारतीय संघातील स्फोटक फलंदाज रोहित शर्मा ( Rohit Sharma ) आणि विराट कोहली ( Virat Kohli ) ही स्पर्धा खेळणार आहे की नाही याबाबत अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

याच पार्श्वभूमीवर भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर ( Sanjay Manjrekar ) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. विराट कोहलीला सिद्ध करून दाखवावं लागेल की सध्या खेळत असलेल्या युवा फलंदाजांपेक्षा तो चांगला पर्याय आहे, असं संजय मांजरेकर  ( Sanjay Manjrekar )  यांनी म्हटलं आहे.

संजय मांजरेकर  ( Sanjay Manjrekar ) म्हणाले, “भारतीय संघाला आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवायचा आहे. हे सर्व विराट कोहली आणि रोहित शर्माच्या पुनरागमनावर अवलंबून असेल, असं अनेकांना वाटतं.

मात्र दोन्ही खेळाडूंना स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे. विराट कोहलीला दाखवावं लागणार आहे की सध्या खेळत असलेल्या युवा फलंदाजांपेक्षा तो एक चांगला पर्याय आहे.

तर दुसरीकडे रोहित शर्माला देखील स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या टी-20 मालिकेमध्ये दोन्ही खेळाडूंचा समावेश नाही.

Irfan Pathan opposed this statement of Sanjay Manjrekar

दरम्यान, संजय मांजरेकर  ( Sanjay Manjrekar ) यांच्या या वक्तव्याला इरफान पठाण यांनी विरोध दर्शवला. संघामध्ये तरुणाई आणि अनुभवाचं मिश्रण असावं असं त्यांनी म्हटलं.

त्याच्या या वक्तव्यावर उत्तर देत मांजरेकरांनी  ( Sanjay Manjrekar ) 2007 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्याची आठवण करून दिली.

ते  ( Sanjay Manjrekar ) म्हणाले,  “मी तुमच्या मताशी सहमत आहे. परंतु तुम्हाला 2007 टी-20 विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना आठवत असेल तर तो सामना आपण जोगिंदर शर्माच्या जोरावर जिंकलो होतो.”

महत्वाच्या बातम्या