Maharashtra Tourism | महाराष्ट्रात फिरायचं आहे? तर ‘या’ ठिकाणांना द्या भेट

Maharashtra Tourism | टीम महाराष्ट्र देशा: भारतामध्ये अनेक प्रेक्षणीय स्थळे आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राला देखील अत्यंत सुंदर आणि आकर्षक पर्यटन ( Maharashtra Tourism ) स्थळ लाभली आहे.

अशात तुम्ही जर या गुलाबी थंडीमध्ये फिरायला ( Maharashtra Tourism ) जाण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकते.

कारण यामध्ये आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील ( Maharashtra Tourism ) काही सुंदर आणि आकर्षक ठिकाणांबद्दल माहिती सांगणार आहोत.

तुम्ही जर फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही महाराष्ट्रातील ( Maharashtra Tourism ) खालील ठिकाणांना भेट देऊ शकतात.

कुडा लेणी, रायगड ( Kuda Caves, Raigad-Maharashtra Tourism )

आजपर्यंत तुम्ही अजिंठा, वेरूळ, कारला इत्यादी लेणीबद्दल ऐकलं असेल. अशात तुम्ही जर लेणीला भेट देण्याचा विचार करत असाल तर तुम्ही रायगड जिल्ह्यातील कुडा लेणीला भेट देऊ शकतात.

निसर्गाच्या सानिध्यात वसलेली ही एक अत्यंत सुंदर लेणी आहे. कुडा हे गाव मुंबई-गोवा महामार्गावर मुंबईपासून 130 कि.मी. तर माणगावच्या आग्नेयस 21 कि.मी. अंतरावर आहे.

या ठिकाणी तुम्हाला 26 कोरीव लेण्यांचा समूह बघायला मिळेल. त्याचबरोबर या ठिकाणी गेल्यावर तुम्ही मुरुड-जंजिरा किल्ल्याला देखील भेट देऊ शकतात. कारण हा किल्ला या लेणीपासून अत्यंत जवळ आहे.

सज्जनगड, सातारा ( sajjangad, Satara-Maharashtra Tourism )

तुम्हाला जर देवदर्शन, ट्रेकिंग, शांतता आणि निसर्ग सौंदर्याचा आनंद एकत्र घ्यायचा असेल तर सज्जनगड तुमच्यासाठी एक सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.

सज्जनगड हा सातारा जिल्ह्यामध्ये स्थित आहे. या किल्ल्यावर समर्थ रामदास स्वामींचे वास्तव्य होते.  किल्ल्यावर रामदास स्वामी यांची समाधी बांधण्यात आली आहे.

साधारण 200 ते 250 पायऱ्या चढल्यानंतर तुम्ही रामदास स्वामींच्या समाधीचे दर्शन घेऊ शकतात. दर्शन झाल्यानंतर निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी तुम्ही किल्ल्याच्या मागील बाजूस जाऊ शकतात. याठिकाणी तुम्हाला सह्याद्री पर्वतरांगेचे सर्वोत्तम नजारे अनुभवायला मिळतील.

कणेरी मठ, कोल्हापूर ( Kaneri Math, Kolhapur-Maharashtra Tourism )

कोल्हापूर शहरापासून बारा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कणेरी गावात सिद्धगिरी मठ आहे. या मठामध्ये भारताची संस्कृती अत्यंत प्रभावीपणे जपण्याचं काम सुरू आहे.

मठामध्ये ग्रामजीवनाची झलक दाखवण्यात आलेली आहे. शिल्पांच्या माध्यमातून बारा बलुतेदार, गावातील जीवन इत्यादी गोष्टी या मठामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात भारताची संस्कृती अनुभवायची असेल तर तुम्ही या ठिकाणाला भेट देऊ शकतात.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.