International Trip | व्हिसाचं टेन्शन बाजूला ठेवून करा बॅक पॅकिंग; कारण ‘या’ देशात जायला नाही लागत व्हिसा

International Trip | टीम महाराष्ट्र देशा: आजच्या सोशल मीडियाच्या युगामध्ये अनेकांना फिरायला आवडतं. अनेक लोक परदेशात ( International Trip ) जाण्याची स्वप्न बघत असतात.

परंतु व्हिसाच्या समस्येमुळे अनेक लोक परदेशी दौरे  ( International Trip ) करणं टाळतात. अशात तुम्ही जर या समस्येमुळे परदेशी दौरा  ( International Trip ) रद्द करण्याच्या विचारात असाल तर थांबा!

तत्पूर्वी ही बातमी वाचून घ्या. कारण या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला अशा काही देशांबद्दल माहिती सांगणार आहोत, ज्या ठिकाणी भारतीय लोक व्हिसाशिवाय जाऊ शकतात. तुम्ही खालील ठिकाणांना व्हिसाशिवाय भेट देऊ शकतात.

मकाऊ  ( Macau-International Trip )

मकाऊला आशिया खंडातील  ( International Trip )  लास वेगास म्हणून ओळखलं जातं. हे अत्यंत सुंदर शहर असून जगभरातील पर्यटक या ठिकाणाला भेट द्यायला येतात.

मकाऊमध्ये तुम्ही सेनाडो स्क्वेअर, मकाऊ टॉवर, वाईन आणि ग्रँड प्रिक्स म्युझियम, सेंट लॉरेन्स चर्च, फ्लोरा गार्डन या आकर्षक आणि सुंदर ठिकाणांना भेट देऊ शकतात.

श्रीलंका  ( Sri Lanka-International Trip )

तुम्ही जर विदेशी दौरा ( International Trip ) करण्याच्या विचारात असाल तर श्रीलंका तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. कारण हा एक अत्यंत सुंदर देश आहे.

श्रीलंकेमध्ये तुम्ही नॅशनल पार्क, टेम्पल ऑफ टूथ आणि नाइन आर्च ब्रिज इत्यादी ठिकाणांना भेट देऊ शकतात. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही जागतिक वारसा स्थळांपैकी एक असलेल्या सिगिरियाचे सुंदर नजारे बघू शकतात.

थायलंड  ( Thailand-International Trip )

थायलंड हा देश तेथील संस्कृती आणि समुद्रकिनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी तुम्ही थायलंडचे आयोध्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयुथया या ठिकाणाला भेट देऊ  ( International Trip )  शकतात.

त्याचबरोबर येथील मु को चांग नॅशनल पार्क, कोह ताओ आयलंड, बँकॉक आणि पै पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करतात.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.