Flight Tips | पहिल्यांदा विमानाने प्रवास करत आहात? तर ‘या’ गोष्टी सोबत ठेवू नका

Flight Tips | टीम महाराष्ट्र देशा: प्रत्येकजण आयुष्यात एकदा तरी विमानाने प्रवास करण्याचे स्वप्न बघत असतो. या प्रवासाचा अनुभव घेण्यासाठी लोक पैसे साठवून आपले स्वप्न पूर्ण करतात.

अशात तुम्ही देखील विमानाने ( Flight Tips ) प्रवास करण्यासाठी उत्सुक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

विमानात ( Flight Tips ) प्रवास करण्यासाठी अनेक नियम पाळावे लागतात. विमानात पोहोचेपर्यंत प्रत्येक टप्प्यावर तपासणी केली जाते. कारण विमानामध्ये बहुतांश गोष्टी नेण्यास परवानगी नाही. विमानामध्ये खालील गोष्टी नेण्यास परवानगी नाही.

टोकदार गोष्टी  ( Pointy things-Flight Tips )

विमानामध्ये ( Flight Tips ) प्रवास करत असताना तुमच्या सामानांमध्ये कोणतेही टोकदार किंवा तीक्ष्ण वस्तू नसायला हवी. यामध्ये ब्लेड, नेल कटर, फाइलर, चाकू इत्यादींचा समावेश होतो.

तपासणी दरम्यान तुमच्या सामानात या गोष्टी आढळून आल्यास तर प्राधिकरणाकडे या वस्तू जमा केल्या जातात. या सर्व प्रक्रियेमध्ये तुमचा अमूल्य वेळ वाया जाऊ शकतो.

अल्कोहोलिक पदार्थ ( Alcoholic substances-Flight Tips )

विमानामध्ये ( Flight Tips ) अल्कोहोलिक पदार्थ नेण्यास परवानगी नाही. तुम्ही जर पहिल्यांदा विमानाने प्रवास करत असाल तर ही गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवायला हवी.

त्याचबरोबर औषधांव्यतिरिक्त तुम्ही कोणत्याही प्रकारचे द्रव्य पदार्थ विमानामध्ये घेऊन जाऊ शकत नाही. लहान मुलांसाठी दूध किंवा इतर पदार्थ तुम्ही फ्लाईटमध्ये नेऊ शकतात. पण यासाठी 100 मिली पर्यंत लिमिट आहे.

स्फोटक पदार्थ ( Explosives-Flight Tips )

विमानामध्ये ( Flight Tips ) प्रवास करत असताना लाइटर मॅच स्टिक किंवा कोणतीही स्फोटक वस्तू सोबत ठेवू नये. तपासणी दरम्यान तुमच्याकडे या गोष्टी आढळून आल्या तर तुमच्यावर गंभीर तपासणी होऊ शकते.

त्याचबरोबर यामुळे तुमच्या समस्यांमध्ये वाढ देखील होऊ शकते. म्हणून विमानामध्ये प्रवास करत असताना या गोष्टी घेऊन जाणं टाळा.

महत्वाच्या बातम्या 

 

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.