Top 10 Richest People | डिसेंबर 2023 मधील ‘हे’ आहेत भारतातील टॉप 10 श्रीमंत लोक; पाहा अंबानी कितव्या क्रमांकावर आहे?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Top 10 Richest People |  टीम महाराष्ट्र देशा: भारतातील सर्वात श्रीमंत अब्जाधीशांसाठी नोव्हेंबर 2023 उंचावणारा ठरला आहे.

निफ्टी 50 ने फक्त नवीन शिखर गाठले नाही तर पाच महिन्यांमधील सर्वात प्रभावी आकडा नोंदवला आहे. यामुळे ठोस आर्थिक निर्देशक आणि परदेशी निधीचा स्थिर ओघ, यामुळे सेन्सेक्सला 11 आठवड्यातील सर्वोच्च पातळीवर नेलं आहे.

एकंदरीत हा महिना भारतातील श्रीमंतांसाठी अधिक महत्त्वाचा ठरला आहे. त्याचबरोबर या महिन्यात यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे.

याच पार्श्वभूमीवर आम्ही तुम्हाला या बातमीच्या माध्यमातून भारतातील टॉप 10 श्रीमंत लोकांबद्दल माहिती सांगणार आहोत.

मुकेश अंबानी ( Mukesh Ambani – Top 10 Richest People )

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जातात.

$90.4 अब्ज किंवा अंदाजे ₹7.53 लाख कोटी संपत्तीसह अंबानी जागतिक अब्जाधीशांच्या यादीत बाराव्या स्थानावर आहेत. वडील धीरूभाई अंबानी यांच्या निधनानंतर 2024 मध्ये मुकेश अंबानी यांनी रिलायन्स कंपनी हाती घेतली.

मेहनत आणि हिमतीच्या जोरावर त्यांनी यशाचा शिखर गाठलं आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांना 2016 मध्ये प्रतिष्ठित पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

पेट्रोकेमिकल्स, रिफायनिंग, तेल, वायू शोध आणि दूरसंचार यांचा अंबानी समूहामध्ये समावेश आहे. त्याचबरोबर रिलायन्स फाउंडेशन संपूर्ण भारतामध्ये आरोग्य, शिक्षण आणि ग्रामीण विकासावर भर देत असते.

Top 10 Richest People

गौतम अदानी  ( Gautam Adani- Top 10 Richest People )

गौतम अदानी जगातील टॉप पाच श्रीमंत लोकांच्या यादीतून बाहेर पडले होते. परंतु, त्यांनी पुन्हा एकदा या यादीत स्थान मिळवलं आहे. सध्या ते या यादीमध्ये दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे.

गेल्या वर्षभरात ५०.३ अब्ज डॉलरचे प्रचंड नुकसान झाल्यानंतर अदानीकडे $७०.२ अब्ज (अंदाजे ₹५.८५ लाख कोटी) संपत्ती आहे.

अदानी एंटरप्रायझेस, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी पॉवर, अदानी विल्मर, अदानी ट्रान्समिशन, अदानी पोर्ट्स अँड सेझ, अंबुजा सिमेंट्स आणि एसीसी इत्यादी अदानी ग्रुपचे भाग आहेत.

प्रख्यात यूएस शॉर्ट-सेलर हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूह व्यापक फसवणूक आणि आर्थिक गैरव्यवहारांमध्ये गुंतलेला असल्याचा अहवाल प्रकाशित केला होता.

याचा अदानींना मोठा झटका बसला होता. त्याचबरोबर यानंतर त्यांची बहुतांश संपत्ती संपुष्टात आली होती. या सर्व घडामोडीनंतर मेहनत आणि कष्टाच्या जोरावर गौतम अदानी पुन्हा एकदा यशस्वी झाले आहे.

Gautam Adani

शापून मिस्त्री  ( Shapoon Mistry- Top 10 Richest People )

शापून मिस्त्री हे शापूरजी पालकोजी समूहाचे संस्थापक आहे. हे भारतातले तिसरे श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जातात.

तर जगातील श्रीमंत व्यक्तीमध्ये यांचं नाव चाळीसाव्या क्रमांकावर आहे. साधारण $32.7 अब्ज (अंदाजे ₹ 2.72 लाख कोटी) संपत्तीचे ते मालक आहे. मेहनत आणि कष्टाच्या जोरावर त्यांनी हे सर्व कमावलं आहे.

Shapoon Mistry

शिव नाडर  ( Shiv Nadar- Top 10 Richest People )

एचसीएल टेक्नॉलॉजीचे सह-संस्थापक शिव नाडर हे भारतातील श्रीमंतांच्या यादीमध्ये चौथ्या क्रमांकावर विराजमान आहे. तर जगातील श्रीमंतांच्या यादीत त्यांचा 45 व्या क्रमांकावर आहे.

त्यांच्याकडे साधारण $31.1 अब्ज (सुमारे ₹2.59 लाख कोटी) एवढी संपत्ती आहे. त्यांची कंपनी भारतातील सॉफ्टवेअर सेवा देणारी एक प्रमुख कंपनी आहे.

नाडर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची कंपनी 45 पेक्षा अधिक देशांमध्ये काम करते. त्यांचं आयटी उद्योगातील योगदान पाहता त्यांना अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले आहे.

Shiv Nadar

सावित्री जिंदाल  ( Savitri Jindal – Top 10 Richest People )

सावित्री जिंदाल या जिंदाल समूहाच्या अध्यक्षा आहेत. जगातील टॉप पाच श्रीमंत व्यक्तींमध्ये या एकमेव व्यावसायिक महिला आहे. त्यांच्याकडे साधारण $23.9 अब्ज (अंदाजे ₹1.99 लाख कोटी) संपत्ती आहे.

सावित्री जिंदाल यांची कंपनी भारतातील एक प्रमुख पोलाद उत्पादक कंपनी म्हणून ओळखली जाते. त्यांनी त्यांच्या कंपनीचा मोठ्या प्रमाणात विस्तार केलेला असून वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये त्यांनी यशस्वी कामगिरी केली आहे. यामध्ये पायाभूत सुविधा, सिमेंट, कापड, वीज निर्मिती इत्यादींचा समावेश आहे.

Savitri Jindal

अझीम प्रेमजी ( Azim Premji – Top 10 Richest People )

अझीम प्रेमजी हे विप्रो लिमिटेडचे माजी अध्यक्ष आहेत. त्यांच्याकडे साधारण $23.4 अब्ज (₹1.95 लाख कोटी) संपत्ती आहे.

भारतातील श्रीमंत व्यक्तीच्या यादीमध्ये त्यांचं नाव पाचव्या क्रमांकावर आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली विप्रो कंपनीने जगभरात मोठा विस्तार केला आहे. 50 हून अधिक देशांमध्ये आज ही कंपनी आहे.

Azim Premji

दिलीप संघवी ( Dilip Sanghvi – Top 10 Richest People )

भारतातील सर्वात मोठ्या फार्मास्युटिकल कंपन्यांपैकी एक असलेल्या सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजचे संस्थापक दिलीप सांघवी हे भारतातील 7 वे श्रीमंत व्यक्ती आहे.

सांघवीची एकूण संपत्ती $20.3 अब्ज (अंदाजे ₹1.69 लाख कोटी) आहे. त्यांचा वार्षिक महसूल वार्षिक महसूल $5.34 अब्ज आहे.

Dilip Sanghvi

राधाकिशन दमानी ( Radhakishan Damani – Top 10 Richest People )

राधाकिशन दमानीएव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेडचे संस्थापक आहे. राधाकिशन दमाणी यांची $18.9 अब्ज (अंदाजे 1.57 लाख कोटी) आहे. त्याचबरोबर ते भारतातील आठवे श्रीमंत व्यक्ती आहे.

मेहनत आणि कष्टाच्या जोरावर त्यांनी ही संपत्ती कमावली आहे. गुंतवणूकदार व्हीएसटी इंडस्ट्रीज, इंडिया सिमेंट्स, टीव्ही टुडे नेटवर्क आणि हेल्थ अँड ग्लो सारख्या कंपन्यांमध्ये भाग घेतात.

Radhakishan Damani

लक्ष्मी मित्तल ( Lakshmi Mittal – Top 10 Richest People )

लक्ष्मी मित्तल हे भारतातील 9 वे श्रीमंत व्यक्ती आहे. आर्सेलर मित्तलचे अध्यक्ष लक्ष्मी मित्तल यांची एकूण संपत्ती $18.8 अब्ज (अंदाजे ₹1.56 लाख कोटी) आहे.

त्यांच्या नेतृत्वाखाली मित्तल उद्योगाच्या तब्बल 60 हून अधिक देशांमध्ये कंपन्या आहेत. जगातील सर्वात मोठी स्टील आणि खान उत्पादक कंपनी म्हणून त्यांची कंपनी उभी आहे.

Lakshmi Mittal

कुमार मंगलम बिर्ला ( Kumar Mangalam Birla – Top 10 Richest People )

कुमार मंगलम बिर्ला हे आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष आहे. $१७.२ अब्ज (सुमारे ₹१.४३ लाख कोटी) आहे. कापड, सिमेंट, रसायने, अॅल्युमिनियम आणि दूरसंचार यासह विविध क्षेत्रांमध्ये विस्तार केला आहे.

त्यानंतर बिर्ला यांनी 28 व्या वर्षी समूहाची सूत्रे हाती घेतली. त्याचबरोबर भारतीय दूरसंचार क्षेत्रामध्ये त्यांची विलक्षण कामगिरी आहे.

Kumar Mangalam Birla

महत्त्वाच्या बातम्या