Share

IND vs PAK | क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ दिवशी भारत-पाकिस्तान येणार आमने-सामने

Under 19 Asia World Cup will start from 8 December 2023

Published On: 

IND vs PAK | टीम महाराष्ट्र देशा: भारत विरुद्ध पाकिस्तान सामना बघण्यासाठी क्रिकेट चाहते नेहमी उत्सुक असतात. अशात एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा 2023 नंतर क्रिकेट प्रेमींना पुन्हा एकदा भारत विरुद्ध पाकिस्तान ( IND vs PAK )  सामना बघायला मिळणार आहे.

भारत आणि पाकिस्तान  ( IND vs PAK ) संघ पुन्हा एकदा एकमेकांना भिडणार आहे. 8 डिसेंबर 2023 पासून अंडर 19 आशिया वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेमध्ये हे दोन्ही संघ आमने-सामने येणार आहे.

8 डिसेंबर ते 17 डिसेंबर दरम्यान अंडर 19 आशिया वर्ल्ड कप स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये तब्बल आठ संघांनी सहभाग घेतला आहे.

अशात क्रिकेट प्रेमींचं लक्ष या स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान  ( IND vs PAK ) सामन्याकडे लागलं आहे. 10 डिसेंबरला भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना होणार आहे.

Live Streaming of IND vs PAK

अंडर 19 आशिया कप स्पर्धेत 10 डिसेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान  ( IND vs PAK ) संघ आमने-सामने येणार आहे.

क्रिकेट प्रेमींना हा सामना आयसीसीच्या यूट्यूब चॅनलवर बघता येईल. या स्पर्धेतील सामने टीव्हीवर प्रसारित केले जाणार नाही.

Team India for U-19 Asia World Cup

उदय सहारन, सौम्य कुमार पांडे, अर्शिन कुलकर्णी, आदर्श सिंग, अरावेली अवनीश राव, मुरुगन अभिषेक, इनेश महाजन, धनुष गौडा, आराध्या शुक्ला, रुद्र मयूर पटेल, सचिन धस, प्रियांशू मोलिया, मुशीर खान, राज लिंबानी आणि नमन तिवारी.

Team Pakistan for U-19 Asia World Cup

साद बेग, अराफात मिन्हास, अहमद हुसैन, अली असफंद, अमीर हसन, मोहम्मद रियाजुल्लाह, मोहम्मद तैयब आरिफ, मोहम्मद जीशान, शाहजेब खान, शमील हुसैन, अजान अवैस, खुबैब खलील, नजाब खान, नवीद अहमद खान, आणि उबैद शाह.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही