Weather Update | नागरिकांनो काळजी घ्या; राज्यातील ‘या’ भागात अवकाळी पावसाची शक्यता

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: डिसेंबरच्या सुरुवातीपासूनच देशातील बहुतांश ठिकाणी अवकाळी पाऊस धुमाकूळ घालत आहे. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे वातावरणात हा बदल ( Weather Update ) होत आहे.

अशात या कमी दाबाच्या पट्ट्याचं रूपांतर मिचॉन्ग चक्रीवादळात झालं आहे. हे चक्रीवादळ तमिळनाडूला सोडून आंध्र प्रदेश किनारपट्टीला धडकलं  ( Weather Update ) आहे.

यानंतर आंध्र प्रदेशमधील सात जिल्ह्यातील साधारण 10 हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. त्याचबरोबर या चक्रीवादळाचा राज्यात देखील परिणाम होताना दिसणार आहे.

Cyclone Michong has hit the coast of Andhra Pradesh

आंध्र प्रदेश किनारपट्टीवर मिचॉन्ग नावाचं चक्रीवादळ येऊन धडकलं आहे. या चक्रीवादळामुळे आज विदर्भातील बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली  ( Weather Update ) आहे.

यवतमाळ, गोंदिया गडचिरोली, नागपूर, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला  ( Weather Update ) आहे. तर उर्वरित राज्यात ढगाळ वातावरण राहणार असल्याचं हवामान खात्याने  ( Weather Update )  म्हटलं आहे.

Coconut Water Benefits

दरम्यान, देशासह राज्यातील काही ठिकाणी पाऊस धुमाकूळ घालत आहे. तर पहाटेच्या वेळी गारठा जाणवत आहे. अशात या बदलत्या वातावरणात  ( Weather Update ) आरोग्याची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे.

या वातावरणात आरोग्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही दररोज सकाळी नारळ पाण्याचे सेवन करू शकतात. नियमित नारळ पाण्याचे सेवन केल्याने आरोग्याला जबरदस्त फायदे मिळतात. याचे सेवन केल्याने वजन नियंत्रणात राहते, रक्तदाब नियंत्रणात राहतो, त्याचबरोबर शरीराला अतिरिक्त ऊर्जा मिळते.

महत्त्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.