Gunaratna Sadavarte | मनोज जरांगेंनी राजकारण करावं अन् आपला पक्ष घोषित करावा – गुणरत्न सदावर्ते

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Gunaratna Sadavarte | मुंबई: सध्या मराठा आरक्षणावरून राज्यातील वातावरण अत्यंत तापलेलं आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी मागणी मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी केली आहे.

त्यांच्या या मागणीला ओबीसी समाजाने विरोध दर्शवला आहे. तर दुसरीकडे मराठ्यांच्या मागणीला वकील गुणरत्न सदावर्ते ( Gunaratna Sadavarte ) यांनी देखील विरोध केला आहे.

अशात मराठा आरक्षणाबाबत राज्य शासनाने क्युरेटिव्ह याचिका दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयात आज या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

याच पार्श्वभूमीवर वकील गुणरत्न सदावर्ते ( Gunaratna Sadavarte ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगेंनी राजकारण करावं अन् आपला पक्ष घोषित करावा, असं गुणरत्न सदावर्ते ( Gunaratna Sadavarte ) यांनी म्हटल आहे.

Manoj Jarange should not demean others – Gunaratna Sadavarte

गुणरत्न सदावर्ते ( Gunaratna Sadavarte ) म्हणाले, “मनोज जरांगे यांनी राजकारण करावं आणि याबाबत कुणाला काहीच हरकत नाही. त्याचबरोबर त्यांनी पक्षाची घोषणा देखील करून टाकावी.

मात्र, त्यांनी इतरांची लायकी काढू नये. त्याचबरोबर त्यांनी इतरांना कलंकित म्हणू नये. त्यांची ही भाषा महाराष्ट्रात चालणार नाही.

क्युरेटिव्ह याचिकेमधून नव्याने काहीच मिळणार नाही. राज्य शासनाला राज्यातील मराठा आरक्षण प्रकरणामध्ये कायदा करता येणार नाही.”

दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगे यांनी जालना जिल्ह्यात आंदोलनाला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांचं हे आंदोलन संपूर्ण राज्यात पसरताना दिसलं.

यानंतर मराठा आरक्षणावर ठोस तोडगा काढण्यासाठी जरांगे यांनी राज्य शासनाला 24 डिसेंबर पर्यंत मुदत दिली आहे. तत्पूर्वी मनोज जरांगे राज्यामध्ये दौरे करत जाहीर सभा घेत आहे.

जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत थांबणार नाही, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. अशात गुरुरत्न सदावर्ते ( Gunaratna Sadavarte )  यांनी केलेल्या वक्तव्यावरून मराठा समाज आणखीन आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महत्वाच्या बातम्या